Chandrapur NMC replaced state of birsa munda  
विदर्भ

चंद्रपुरात आदिवासी बांधवांचा उपोषणाचा इशारा; मनपानं क्रांतिवीर बिरसा मुंडांचा पुतळा हटवल्यामुळे संताप 

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : रेल्वेस्थानकाजवळील बीएसएनएल कार्यालयाजवळ क्रांतिवीर बिरसा मुंडा चौक आहे. मनपाने नामकरण केलेल्या या चौकात आदिवासी संघटना आणि समाजबांधवांच्या पुढाकारातून क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा बसविण्यात आला. मार्च महिन्यात लोकार्पणाची तयारीही सुरू होती. अशात शनिवारी (ता. 27) महापालिका प्रशासनाने पुतळा हटविला. यामुळे आदिवासी समाजबांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने त्याच जागेवर रीतसर पुतळा बसवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करून उपोषण केले जाईल, असा इशारा दिला आहे.

चंद्रपूर शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गोंडराजाचेही या जिल्ह्यात वास्तव्य होते. अनेक प्राचीन वास्तू, स्मारके या इतिहासाची साक्ष देतात. त्यामुळे चंद्रपूर शहरात आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचे स्मारक, पुतळा उभारण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून आदिवासी समाजातील विविध संघटना, समाजबांधवांच्या वतीने केली जात आहे. 

त्यासोबतच शहरातील चौकांना महापुरुषांची नावे देण्याचीही मागणी केली होती. यासाठी अनेक आंदोलने झाली. धरणे देण्यात आले. महापौर, आयुक्तांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व मोठ्या अधिकारी, नेत्यांना निवेदने देण्यात आली.

त्यानंतर चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने रेल्वेस्थानकाजवळील बीएसएनएल कार्यालयाजवळ क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या स्मारकासाठी जागा आरक्षित केली होती. त्यानंतर आदिवासी समाजाने या चौकात क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर समाजबांधवांनी आपापल्या परीने वर्गणी गोळा या चौकात मागील आठवड्यात पाच फुट उंचीचा पुतळा उभारला. 

आता मार्च महिन्यांत या पुतळ्याचे लोकार्पण करण्याची तयारी सुरू केली. अशात शनिवारी मनपा प्रशासनाने कोणतीही सूचना न देता पुतळा हटविला. या प्रकाराची माहिती होताच आदिवासी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकते, समाजबांधवांनी धाव घेतली.
महापालिकेने पुतळा हटविण्याची केलेली कारवाई निषेधार्ह असून, रीतसर तेथे पुतळा बसविण्यात यावा. अन्यथा आदिवासी समाजातर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अनिल सुरपाम, कृष्णा मसराम, राजेंद्र सुर्वे, डॉ. पंकज कुलसंगे, विनोद तोडसाम, महेंद्र शेडमाके, दिवाकर मेश्राम, जितेंद्र कुळमेथे यांनी दिला.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT