chandrapur peon 
विदर्भ

गळा सुकला....तरीही 100 तासांपासून तो देतोय जागृतीचा संदेश

संदीप रायपुरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : सकाळी लवकर उठायचे आपली पूर्ण कामे आटोपून आठ वाजता नगरपंचायत गाठायची अन् मग हातात माईक घेऊन जागृती संदेश देत निघायचे. दुपारी दीड ते दोन पर्यंत जेवण करायचे अन् पुन्हा काम सुरू सात वाजेपर्यंत. गेले दहा दिवस तो निरंतरपणे हे काम करतोय गळा सुकला, पण पठ्ठ्याने हिंमत हारली नाही. म्हणतो, हे काम नोकरी म्हणून नाही तर जनसेवा म्हणून करतो आहे.

कोरोना व्हायरसने जगभरात अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याने प्रचंड चिंतेचे वातावरण आहे. अशात लोकांनी घराराबाहेर पडू नये, यासाठी प्रशासनाकडून जागृती मोहीम सुरू आहे. गोंडपिपरीतील रमेश कुमरे हे नगरपंचायतीत शिपाई म्हणून काम करतात. पण सध्या ते चर्चेत आले त्यांच्या निरंतरपणे कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या जागृती संदेशामुळे. 

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हा प्रशासन नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. याचाच एक भाग म्हणून गोंडपिपरी नगरातही जागृती केली जात आहे. रमेश कुमरे यांना नगरपंचयातीने जागृती संदेशाची जबाबदारी दिली. ती जबाबदारी कुमरे केवळ नोकरी म्हणून नाही, तर अशा संकटकाळात जनसेवा म्हणून करीत आहेत. सकाळी आठ ते सायंकाळी सातपर्यंत नगरातील गल्ल्यागल्यांत ते माईकद्वारे सातत्याने संदेश देत आहेत.

गेले दहा दिवस त्यांचा हा संदेशाचा प्रवास निरंतरपणे सुरू आहे. वारंवार बोलल्याने त्यांचा गळा सुकला आहे. पण या  पठयाने हिंमत हारली नाही. कोरोनाला हरविण्याची आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे गळा सुकला तरी निरंतरपणे आपले काम सुरूच ठेवणार असल्याचे कुमरेंनी सकाळशी बोलताना सांगितले.

कोरोनाच्या लढाईत प्रशासनातील विविध यंत्रणा खूप मेहनत घेत आहेत. अशावेळी नगरपंचायतीच्या एका शिपायाचा हा लढाही अतीशय महत्त्वपूर्ण ठरला आहे.

आपण कोरोनाला हाकलून लाऊ शकतो
कोरोनावर मात करू शकतो. समाजातील प्रत्येक घटक जागृत राहिला व शासनाच्या निर्देशांचे पालन केले तर आपण कोरोनाला हाकलून लाऊ शकतो. कोरोनावर मात करण्याचा हाच उत्तम मार्ग आहे. गेल्या दहा दिवसांपासून शंभर तास मी हाच संदेश देत फिरत आहे.
- रमेश कुमरे, गोंडपिपरी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT