chani police.jpg 
विदर्भ

पोलिसांनी पकडला राजस्थानातील 71 मजुरांचा ट्रक

श्रीकृष्ण लखाडे

चतारी (जि. अकोला) : पातूर तालुक्यातील चान्नी पोलिसांनी 27 मार्च रोजी मध्यरात्री नाकाबंदी दरम्यान राजस्थानातील मजुरांचा ट्रक पकडला. हैद्राबाद येथून 71 मजूर हे राजस्थान येथील आपल्या मुळगावी जात होते. पातूर पोलिसांनी आरोग्य विभागाला यासंदर्भात माहिती देऊन त्यांची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.

राजस्थानमधून बोलावला होता ट्रक
सध्या जगभरात कोरोना व्हायरसची दहशत पसरली आहे. त्याचा प्रसार थांबावा यासाठी 22 मार्चपासून केंद्र शासनाने लॉकडाऊचे आदेश दिले आहे. राजस्थानातील मजूर हैदराबाद येथे मजुरी करण्यासाठी गेले होते. परंतु, देशामध्ये लोकडाऊन झाल्यामुळे ते मजूर हैदराबाद येथे अडकले होते. मजुरांनी राजस्थान राज्यातील ट्रक बोलावून त्यामध्ये 71 मजूर हैदराबाद येथून राजस्थानकडे परत जात असताना, चान्नी पोलिसांनी 27 मार्च रोजीच्या मध्यरात्री नाकाबंदी दरम्यान आर. जे. 21 जी. बी. 1314 क्रमांकाचा ट्रक मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास उमरा येथे पकडला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सर्वांची सूटका
सर्व मजुरांना जय बजरंग विद्यालयत आणून सर्व मजुरांना चहा-नाश्ता व जेवणाची व्यवस्था पोलिसांनी केली होती. त्या सर्व मजुरांचे ओळखपत्र तपासून कसून चौकशी केली. सदर कारवाईची माहिती मिळताच बाळापूरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके, पातूरचे तहसीलदार दीपक बाजड, सस्ती प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. निलेश गाडगे हे सर्व आपल्या ताफ्यासह चान्नी येथे दाखल झाले आणि सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली असता, त्यापैकी एकही कोरोनाचा संशयीत आढळला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व मजुरांना राजस्थानातील मुळगावी जाण्यासाठी आदेश दिले. सर्व मजुरांना तहसीलदारांनी जेवणाची व्यवस्था केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narhari Zirwal video case : मंत्री नरहरी झिरवाळ प्रकरणाला नवे वळण, कथीत व्हिडिओतील तृतीयपंथीयाची स्वतःच्या भावाविरोधात पोलिसांत तक्रार

New Labour Code लागू! १ एप्रिलपासून पगार, ओव्हरटाईम आणि कामाचे नियम बदलणार; तुमच्या सॅलरीवर नेमका काय परिणाम?

Latest Marathi News Live Update : मेळघाट परिसरात अवकाळी पावसाची हजेरी

IPL 2026: वैभव सूर्यवंशीने भरमैदानात कुणाला दिला Flying KISS? राजस्थान रॉयल्सच्या विजयानंतरचा VIDEO VIRAL..

MLA Vijay Shivtare : बापासाठी काळजाचा तुकडा सरसावला! आमदार शिवतारेंना लेकीने दान केली किडनी; बाप-लेकीच्या नात्याला महाराष्ट्र करतोय 'सलाम'

SCROLL FOR NEXT