A child in Chandrapur district fulfilled his mother wish 
विदर्भ

लॉकडाऊनमध्येही त्याने आईची अखेरची इच्छा केली पूर्ण, मात्र...

संदीप रायपुरे-नीलेश झाडे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन मुलं आणि एक मुलगी असे तीन अपत्य असलेल्या आईची प्रकृती खराब झाली. काही दिवसातच त्यांचे निधल झाले. देशात कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने आईची शेवटची इच्छा पूर्ण करणे शक्‍य नव्हते. अशाही परिस्थितीत मुलाने आईच्या इच्छेचा मान ठेवत ती पूर्ण केली. यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. मुलाच्या या प्रयत्नाची परिसरात चर्चा होती. 

विमल व्यंकटी कटकमवार या चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा येथील रहिवासी. आयुष्यातील अनेक वर्षे याच गावात गेल्याने येथील मातीशी नाळ जुळलेली. त्यांच्या आयुष्यात दोन मुलं आणि एक मुलगी अशी तीन फुले उमलली. जीवन आनंदात सुरू होते. मुले मोठे झाले व लग्नही झाले. दोन्ही मुलांना व्यवसायामुळे वेगवेगळे राहावे लागले. एक मुलगा चंद्रपूर तर दुसरा मुलगा चुनाळा येथे राहू लागला.

जीवन आनंदात जात असताना विमल यांचे वय वाढत गेले. वय जास्त झाल्याने त्यांनी राजुरा तालुक्‍यातील चुनाळा येथे राहणारा लहान मुलगा प्रमोद कटकमवार याच्याकडे राहण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून त्या लहान मुलाकडेच वास्तव्यास होत्या. अशात अचानक विमल यांची प्रकृती खराब झाली. आईची प्रकृती खराब झाल्याने मुलाने तात्काळ रुग्णालयात दाखल केले. आई लवकरच बरी होईल या आशेवर मुलगा होता. 

मात्र, आजार थोडा गंभीर असल्याने विमल यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला. परंतु, प्रकृतीत काहीही सुधारणा झाली नाही उलट अधिकच खराब होत गेली. यामुळे चंद्रपुरातील डॉक्‍टरांनी विमल यांना नागपुरातील रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला दिला. आईचा जीव वाचविण्यासाठी प्रमोद लॉकडाऊनमध्ये लगेच रुग्णवाहिकेने नागपूरच्या दिशेने निघाला. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. 

नागपूरला येत असताना बुटीबोरीजवळ विमला यांनी अखेरचा श्‍वास घेतला. अचानक आई निघून गेल्याने प्रमोदवर दु:खाचा डोंगर कोसळला. देशात लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व अडचनींना पार करीत तो परत चुनाळा येथे पोहोचला. आई गेल्याची माहिती त्याने भाऊ व बहिणीला दिली. यानंतर अंत्यसंस्कार कुठे करावं हा प्रश्‍न पडला. अनेक वर्षांपासून त्या चुनाळा येथे स्थायिक असल्याने अनेकांशी ऋणाणूबंध जुळले होते. शिवाय मुळ गावात घर वगळता कुणीही नातेवाईक नव्हते. तरीही धाबा येथे अंत्यसंस्कार करून आईची अंतिम इच्छा पूर्ण केली. 

इच्छेचा ठेवला मान

चुनाळा येथे ऋणाणूबंध जुळले असतानाही राजेशने आईची अंतिम इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. कारण, आईने जिवंतपणी आपले अंत्यसंस्कार धाब्याच्या भूमीतच व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. अगदी जवळचे नातेवाईक, मुलगी विणा यांच्या उपस्थितीत धाबा या मुळगावी विमल कटकमवार यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडला. आईच्या शेवटच्या इच्छेखातर मुलाने मुळगावात केलेल्या अंतिम संस्काराची परिसरात चर्चा सुरू आहे.

मोठा मुलगा मुकला अंत्यसंस्काराला

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण होऊन बसले आहे. आईचे निधन झाल्याचे समजताच मोठा मुलगा सुरेशला मोठा धक्‍का बसला. तो अंत्यसंस्कारासाठी धाबा येथे येण्यासाठी निघाला. मात्र, लॉकडाऊनमुळे त्याला येणे जमले नाही. यामुळे त्याला आईचे अंतिम दर्शनही घेता आले नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

America-Israel: ट्रम्प-नेतान्याहूंमध्ये खडाजंगी? युद्धाच्या धोरणावरून मतभेद; अमेरिकेतील माध्यमांचे वृत्त

Bakrid Sacrifice Rule: गायीची कुर्बानी अनिवार्य नाही, बकरीदपूर्वी हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय; धार्मिक परंपरेबाबत स्पष्ट भूमिका

ITI Admissions 2026: राज्यातील शासकीय-खासगी आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; १,५७,६६४ जागांसाठी संधी

GT vs CSK Live: साई सुदर्शनचे शतक हुकले! शुभमन, बटलरनेही झोडले! चेन्नईसमोर मोठं लक्ष्य, संजू सॅमसन फलंदाजीला येणार का?

SCROLL FOR NEXT