Child marriage stopped at Wifad in Wardha district 
विदर्भ

बालविवाह संबंधी सुरू होती जनजागृती; अधिकाऱ्यांच्या कानात माहिती देताच सुरू झाली धावाधाव

सकाळ डिजिटल टीम

वर्धा : जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत वायफड येथे जनजागृती सुरू होती. यावेळीच गावात बालविवाह होत असल्याची माहिती बालविकास अधिकाऱ्यांना मिळाली. लगेच अधिकाऱ्यांनी धडक देत पोलिसांच्या मदतीने हा बालविवाह रोखला. शिवाय मुलीच्या पालकांकडून जबाबनामा लिहून घेतला.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष बाल संरक्षण व बाल विवाह या विषयावर जागृती कार्यक्रम राबवित आहे. जिल्ह्यातील गावांमध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी जाणीव जागृती कार्यक्रम घेत असतात. वायफड या गावात जाणीव जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. कार्यक्रमात बालसंरक्षण, बालविवाह या विषयावर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाच्या गावात एका १२ वर्षांच्या मुलीचा विवाह होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. माहिती मिळताच त्यांनी प्रत्यक्ष स्थळावर भेट दिली. यावेळी मंडप डेकोरेशन व इतर अनेक विवाहसंबंधी बाबी तेथे दिसून आल्या. त्यानुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात आली.

शिवाय बालिकेच्या आई-वडिलांकडून जबाबनामाही लिहून घेत मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत विवाह करता येणार नाही, असे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर, पुलगाव येथील पोलिस निरीक्षक गायकवाड, सरपंच विजय राऊत, ग्रामसेवक राजेंद्र सोरते, पर्यवेक्षिका ममता रामटेके, वैशाली मिस्कीन, सुनंदा हिरूडकर, मेघा तमगीरे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Recruitment 2026 : MPSC चा मोठा निर्णय! औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; पोलिसांच्या चौकशीनंतर फेरपरीक्षेची घोषणा, उमेदवारांना पुन्हा द्यावी लागणार परीक्षा!

Gajanan Devkate: सरकारच्या थकीत बिलांचा बळी, कार्यालयांचे उंबरठे झिजवले पण...; देवकातेंचा हृदयद्रावक अंत, सरकारविरोधात कंत्राटदारांचा संताप

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

SCROLL FOR NEXT