rape 
विदर्भ

बालपणीच्या मित्राने केला एकीचा विश्‍वासघात, दुसरीला थाप मारून अज्ञात स्थळी नेले  

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीसह मोलमजुरी करणाऱ्या विवाहितेवर अत्याचार झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. प्रकरणी राजापेठ पोलिसांनी शुक्रवारी, 13 मार्च रोजी अल्पवयीन युवक आणि एक अनोळखी व्यक्ती अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

पीडित विद्यार्थिनी बाहेर जिल्ह्यातील रहिवासी असून, काही वर्षांपासून अमरावती शहरात शिकायला आहे. तिच्या बालपणीचा अल्पवयीन मित्र शहरातच शिकतो. तो भाड्याच्या खोलीत राहतो. दोघेही शहरात शिकायला असल्यामुळे त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. त्यानंतर अल्पवयीन मित्राने पीडितेला आपल्या खोलीवर बोलावून तिच्यावर जबरीने अत्याचार केला होता, असा आरोप पीडितेने मूर्तिजापूर (जि. अकोला) ठाण्यात दाखल तक्रारीत केला आहे. शिवाय तिला अनेकदा मोबाईलवरून मॅसेज पाठवून तो त्रास देत होता. घटनास्थळ आयुक्तालयातील राजापेठ हद्दीतील असल्याने मूर्तिजापूर पोलिसांनी हा तपास राजापेठ पोलिसांकडे वर्ग केला. त्यात शुक्रवारी (ता. 13) अल्पवयीन मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

जास्त मजुरी मिळवून देण्याची मारली थाप

विवाहितेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा दुसरा एक गुन्हा गुरुवारी (ता. 12) रात्री राजापेठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. पीडित महिला (वय 31) एका हॉटेलमध्ये मजुरीचे काम करते. काम आटोपून ती दुपारी घराकडे परत जात असताना एका अनोळखी दुचाकीस्वाराने तिला गाठले. दहा हजार रुपये महिना मजुरी देऊन काम मिळवून देतो, अशी बतावणी करून त्याने तीचे अपहरण केले. राजहिलनगर येथील एका पडिक घराच्या परिसरात नेऊन जबरीने त्या अनोळखी व्यक्तीने अत्याचार केला, असा आरोप पीडित महिलेने राजापेठ ठाण्यात दाखल तक्रारीत केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT