wardha  
विदर्भ

वर्धेतल्या छोट्या दोस्तांच्या किमयेतून उगवणार हजारो रोपटी

रूपेश खैरी

वर्धा : पर्यावरण रक्षण हा संस्कार आहे. तो लहान वयातच जर मनात रुजला तर पुढच्या काळात पर्यावरण संवर्धन कठीण नाही, लॉकडाउनमुळे शाळांना तीन महिन्यांपासून सुटी आहे. सुटीच्या काळात चिमुकल्यांकडून घरी होणाऱ्या मस्तीला ब्रेक देत त्यांच्या मनात पर्यावरणाची आवड निर्माण होण्यासाठी येथील पीपल फॉर ऍनिमलच्या वतीने घरीच सीड बॉल तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

करूणाश्रमात चिमुकल्यांकडून दीड हजार सीडबॉलची निर्मिती झाली. पावसाच्या सरी कोसळताच हे सीड बॉल पिपरी (मेघे) येथील इको पार्क इथे टाकण्यात येणार आहेत. वाळलेल्या दीड हजार सीड बॉलमुळे हिरवी झाडे निर्माण होतील.

शाळांना सुटी असल्याने येथील पीपल फॉर ऍनिमलचे आशीष गोस्वामी यांच्या करूणाश्रमात त्यांची दोन मूल आणि काही सहकाऱ्यांनी एकत्र येत माती आणि शेण गोळा करून हे सीड बॉल तयार केले. या सीड बॉलमध्ये कडुनिंब, बेल, बेहडा, करंज आदी झाडांच्या बिया टाकल्या आहेत. बिया असलेले हे सीड बॉल सध्या चांगले वाळले आहेत. या सीड बॉलचा संपर्क पावसाच्या पाण्याशी येताच त्यातले बीज अंकुरणार आहे. या रोपट्यांचे संवर्धन करून झाडे तयार होतील आणि पर्यायाने पर्यावरणाचे रक्षण होईल, अशी अपेक्षा हा उपक्रम राबविताना व्यक्‍त करण्यात आली.

एवढेच नाही तर चिमुकल्यांना या माध्यमातून पर्यावरणाचे धडे देणेही शक्‍य आहे. तसेच माती, पाणी आणि बीज यांचा एकमेकांशी संपर्क आल्यास त्यातून रोपटे आणि पुढे त्याचे वृक्षात कसे रूपांतर होते, याची माहितीही मुलांना व्हावी आणि त्यांच्या हातून पर्यावरण रक्षणाचे काम व्हावे असा दुहेरी उद्देश यामागे असल्याचे हा उपक्रम राबविणाऱ्या पीपल फॉर ऍनिमलकडून सांगण्यात आले आहे.

निम्मे बीज अंकुरले तरीही समाधान
पीपल फॉर ऍनिमलच्या करुणाश्रमात राबविण्यात आलेल्या या उपक्रमात आशीष गोस्वामी, त्यांची ओम आणि सोहम ही दोन मुले, पुतण्या अशा चार जणांनी हा उपक्रम राबविणे सुरू केले. या चार चिमुकल्यांना करुणाश्रमातील सहकारी ऋषिकेश गोडसे यांचे सहकार्य मिळाले. या उपक्रमात आतापर्यंत 1 हजार 500 सीड बॉल तयार करण्यात आले आहेत. यातील किमान 50 टक्‍के बीज अंकुरले तरी बरीच झाडे तयार होतील, याचे समाधान असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

वेळेचा सदुपयोग
उन्हाळ्यात मुलं घरीच होती. लॉकडाउनमुळे बाहेर फिरणे देखील होत नव्हते. सुट्या घालविण्यासाठी पर्यावरण पूरक उपक्रम राबविले. यात मुलांचा वेळही गेला आणि त्यांना पर्यावरण अभ्यासाचे धडेही मिळाले. मुलांच्या सहकार्यातून दीड हजार सीड बॉल तयार झाले.
आशीष गोस्वामी
पीपल फॉर ऍनिमल, वर्धा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात अस्थिरता! गुंतवणूकदार सावध; कोणते शेअर्स वाढले?

Dhangar Reservation: भाजपने धनगर समाजाला भरपूर दिले: खासदार वडकुते, मुख्यमंत्री फडणवीसांचे काम कौतुकास्पद

Marathi Bandishi Project: मराठी बंदिशींचे होणार दस्तावेजीकरण; पुस्तक, दृकश्राव्य स्वरूपात जतन, मराठी भाषा विभागाचा प्रकल्प

Ebola Cases: कोरोना विसरा... आता भारताच्या दारात ‘इबोला’! बंगळूरमध्ये महिला विलगीकरणात, नागपूरमध्येही वाढली चिंता

शिवसेना आमदारांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना साकडे, पालकमंत्र्यांची दिल्लीवारी; भाजपचं नाव ठरलं पण

SCROLL FOR NEXT