विदर्भ

पालकांचे छत्र हरविलेली चिमुकली वाऱ्यावर; समाजाने पुढाकार घेण्याची गरज

सुधीर भारती

अमरावती : कोरोनामुळे (coronavirus) अनेक बालकांचे आई तसेच वडिलांचे छत्र हिरावले गेले आहेत. अशा दुर्दैवी प्रसंगी खुद्द काही समाजकंटकांकडून त्यांना दत्तक देण्याच्या नावावर खेळ मांडला जात आहे. विशेष म्हणजे, महिला तसेच बालकल्याण समिती (Women as well as Child Welfare Committee) किंवा चाइल्डलाइनकडे (Childline) अशा बालकांच्या नोंदीच आल्या नसल्याने आता समाजाकडून त्यांच्यावर ‘डोळस’पणे लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे. (Chimukali lost her parents Amravati news)

कोरोना महामारीमुळे जवळपास सर्वांचेच जीवन प्रभावित झाले आहे. अनेकांचे संसार उद्‍ध्वस्त झाले आहेत. कुटुंबातील कर्ता पुरुषाचे निधन झाले तर अनेक कुटुंबातील महिला कोरोनामुळे दगावल्या आहेत. याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे तो चिमुकल्या मुलामुलींवर. अनेक ठिकाणी तर दुर्दैवाने माता व पिता अशा दोघांचाही कोरोनाने बळी घेतल्याने अनेक मुलांच्या डोक्‍यावरून पालकांचे छत्रच हिरावले गेले.

अशा बालकांना सुरक्षित वातावरण मिळणे गरजेचे आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे आई वडिलांचे छत्र हिरावलेल्या बालकांची महिला व बालकल्याण समिती तसेच चाइल्डलाइनकडे नोंदच झालेली नाही. बहुतांश ठिकाणी जवळचे नातेवाईकच त्यांचा सांभाळ करण्यास तयार झाले आहेत. कारण बालगृह हा शेवटचा पर्याय समजला जातो. मात्र अद्याप अशा बालकांचे प्रवेशच झालेले नाहीत. त्यामुळे आता समाजाकडूनच त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.

व्हायरल मॅसेजने खळबळ

मध्यंतरी कोरोनामुळे माता-पित्यांचे छत्र हरविलेल्या चिमुकल्यांना दत्तक देण्याबाबतचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे महिला व बालकल्याण समितीने तातडीने त्यामध्ये लक्ष घातले. तसेच अशा प्रकारच्या मॅसेजवर विश्‍वास न ठेवता तातडीने जिल्हा बालसंरक्षण कक्ष किंवा चाइल्डलाइनशी संपर्क साधून त्या बालकांचे जीवन सुरक्षित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अनाथ झालेल्या चिमुकल्यांचे आयुष्य उद्‍ध्वस्त होता कामा नये, यासाठी नागरिकांनी जागरूक राहून अशा बालकांविषयी बालकल्याण कक्षाला माहिती देणे गरजेचे आहे. परस्पर कुणीही बालकांना दत्तक घेता कामा नये. (Chimukali lost her parents Amravati news)
- ॲड. सीमा भाकरे, विधी तथा परिविक्षा अधिकारी, जिल्हा बालसरंक्षण कक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Beed Baby News: मृत घोषित केलेलं बाळ रात्रभर दुर्लक्षित; दुसऱ्या दिवशी बॅगमध्ये टाकून नेलं, कुदळ सापडेना म्हणून झाला उशीर अन्...

तेजश्री प्रधानच्या झी मराठीवर दिसण्यावर स्टार प्रवाहच्या सतीश राजवाडेंची थेट प्रतिक्रिया; म्हणाले, 'ती नायिका आधी...

IND vs ENG 3rd Test: जो रूटचे विक्रमी शतक! भारतासमोर मजबूत भिंतीसारखा राहिलाय उभा; राहुल द्रविड, स्टीव्ह स्मिथचा विक्रम मोडला

SCROLL FOR NEXT