Cyber crime
Cyber crime 
विदर्भ

नागरिकांनो सावधान! कोविड लस नोंदणीवर आता सायबर गुन्हेगारांची नजर 

संतोष तापकिरे

अमरावती ः कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी असणारी लस शासनामार्फत घोषित कार्यक्रमानुसार दिली जाईल. परंतु ही लस येण्यापूर्वीच त्याला तोतयांकडून ऑनलाइन नोंदणीचे ग्रहण लावण्याचा सपाटा मात्र सुरू झाला.

मागील काही दिवसांपासून सायबर गुन्हेगार देशात सक्रिय झालेत. इंटरनेटच्या माध्यमातून सोशल मीडियाचा वापर करून सामान्य जनतेची फसवणूक करीत असल्याच्या बऱ्याच घटना पुढे येत आहेत. अशा तोतयांकडून आता कोविड-१९ च्या काळात लस देण्यापूर्वी नोंदणीचे कारण पुढे करूनसुद्धा नागरिकांकडून गोपनीय माहिती, ओटीपी, ई-मेल आयडी, आधारकार्ड, बॅंक कार्डचे डिटेल्स नागरिकांना विचारत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

शासनाकडून सामान्य जनतेला कोविड लस देण्याकरिता ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा फोनकॉल्सच्या माध्यमातून आधारकार्ड, ओटीपी अथवा ई-मेल आयडी याची मागणी करण्यात येत नाही. त्यामुळे कुणीही अनोळखी व्यक्ती अशी माहिती मागत असेल तर अशा लोकांना नागरिकांनी माहिती देऊ नये, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी केले आहे. आधारच्या नावाखाली ओटीपी शेअर झाल्यास आधार कार्डशी लिंक असलेल्या बॅंक खात्यामधून पैसे काढून फसवणूक होण्याची शक्‍यता अधिक आहे. 

नागरिकांना अशाप्रकारची गोपनीय माहिती अनोळखी व्यक्ती मागत असेल तर सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. त्यातून फसवणूक टाळता येईल.
-डॉ. आरती सिंह, पोलिस आयुक्त, अमरावती शहर.


संपादन ः राजेंद्र मारोटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT