cleaning women.jpeg 
विदर्भ

Video : बापरे! महिला सफाई कामगार देतेय रुग्णांना इंजेक्शन

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्ह्यातील गोरगरिब रुग्णांसाठी उपचार करून घेण्यासाठी शेवटचे ठिकाण आहे. मात्र, याच ठिकाणी डाॅक्टर नव्हे तर चक्क सफाई कामगारांकडून रुग्णांवर उपचार करण्याचा जीवघेणा खेळ खेळला जातो. या बेजबाबदार पणाची चित्रफीत पप्पू गोटे या सजग नागरिकाने काढल्यानंतर ही बाब समाजमाध्यमांवर प्रसारीत झाल्याने, एकच खळबळ उडाली आहे. 

या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांनी संबंधीत सफाई कामगाराला कामावरून कमी केले असले तरी, सफाई कामगाराकडे इंजेक्शन व उपचार करण्याचे इतर साहित्य आलेच कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या बेजबाबदारीमध्ये इतरही कर्मचारी सहभागी असल्याची चर्चा रुग्णालय परिसरात आहे. वाशीम येथे जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये खेड्यापाड्यांतून दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. 

जिवाशी होतो खेळ
खासगी दवाखान्यांमध्ये जाण्यासाठी आर्थिक ऐपत नसलेले रुग्ण उपचारासाठी येत असले तरी, त्यांच्यावर उपचार होण्याऐवजी त्यांच्या जिवाशी खेळ केला जात असल्याचे प्रकार याआधीही घडले आहेत. मात्र, ता. शनिवारी (ता.25) या जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेला धक्कादायक प्रकार एका सजग नागरिकाने काढलेल्या चित्रफीतीमुळे उघड झाला. रुग्णालयामध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी परिचारिका व डाॅक्टर असतात.

पप्पू गोटे यांनी काढला व्हिडीओ
रुग्णालयातील एक सफाई कामगार वाॅर्डाची सफाई केल्यानंतर परिचारिकेच्या समोरच रुग्णास इंजेक्शन देत असल्याचे चित्रफीतीत दिसत आहे. तसेच ती सफाई कामगार वाॅर्डाची स्वच्छता करतानाही दिसत आहे. हा प्रकार तेथे उपस्थित असलेल्या पप्पू गोटे या सजग नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत करून, तो प्रसारीत केला. त्यामुळेच ही बजबजपुरी उघड झाली आहे.                                                                                                                                 

इंजेक्शन देत असल्याचे निदर्शनास आले                                                             काही कामानिमित्त मी जिल्हा सामान्य रुग्णालयात गेलो असता, सफाई कामगार एका महिला रुग्णास इंजेक्शन देत असल्याचे दिसले. माझ्या मोबाईलमध्ये त्याचे चित्रण केले. याबाबत पालकमंत्र्यांकडे व्हिडीओ व निवेदन दिले असून कारवाईची मागणी केली आहे.
- पप्पू गोटे,
जग नागरिक

महिलेने जबरदस्तीने दिले इंजेक्शन
जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये माझी प्रसुती झाल्यानंतर मला सकाळी सफाई कामगार महिला इंजेक्शन देण्यासाठी आली. तेव्हा मी त्या सफाई कामगार महिलेला तुम्ही देऊ नका, असे सांगितले. मात्र, त्या महिलेने जबरदस्तीने आपल्याला इंजेक्शन दिले आहे.
- सुजाता पट्टेबहादूर, रुग्ण

सफाई कामगाराला कामावरून काढले
हा जीवघेणा प्रकार उघड झाल्याने रुग्णालय प्रशासनाने संबंधीत कंत्राटी महिला सफाई कामगाराला कामावरून काढले आहे आणि या प्रसुती वाॅर्डामध्ये जी परिचारिका काम करीत होती. तिची चौकशी करून कारवाई करणार आहे.
- डाॅ. अंबादास सोनटक्के,
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशीम

कारवाईचा बडगा सफाई कामगारावरच का?
जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा हा प्रकार समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने कंत्राटी सफाई कामगाराला कामावरून काढून टाकले आहे. मात्र, या सफाई कामगाराकडे उपचार करण्याचे साहित्य दिले कुणी, चित्रफीतीमध्ये उभ्या  असलेल्या परिचारिकेने तिला अटकाव का केला नाही, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सफाई कामगारच जर रुग्णांवर उपचार करीत असतील तर, गलेलठ्ठ वेतन घेणाऱ्या डाॅक्टरांचे काय काम असा प्रश्न निर्माण होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट ! महागाईच्या पार्श्वभूमीवर ५०% DA मर्जर होणार ?

T20 WC, IND vs WI : शिमरोन हेटमायरच्या विकेटवरून 'राडा'! विडींजच्या खेळाडूंची तीव्र नाराजी, वातावरण तापले; जसप्रीतने दिले २ धक्के

Pune News: पुणे, पिंपरीतील ५९ ‘आरएमसी’ प्रकल्पांना टाळे; हवेत विष कालविल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई!

Palghar News: जलमार्गाने प्रवास सुखकर! 'जलसार ते मारंबळपाडा'दरम्यान एक लाख प्रवाशांचा टप्पा पार

Sangrampur News: संग्रामपुरात आदिवासींची होळी; भोंगर्‍या बाजाराने रंगला सातपुडा, होळीची काय आहे लोककथा?

SCROLL FOR NEXT