Cloudy weather in vidarbha 
विदर्भ

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात ढगाळ वातावरण; थंडी पळविली आणि पावसाची शक्यता

नरेंद्र चोरे

नागपूर : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे थंडीचा कडाका कमी झाला आहे. ढगाळ वातावरण दोन-तीन दिवस कायम राहण्याची शक्यता असल्यामुळे वैदर्भींची दिवाळी काहीशी गुलाबी थंडीत जाण्याची शक्यता आहे.

विदर्भात अपेक्षेप्रमाणे थंडीचा कडाका वाढू लागला होता. काही दिवसांपूर्वी तापमानात मोठी घट होऊन पारा १२.८ अंशांवर आला होता. हिमाचल प्रदेशसह उत्तर भारतातील बहुतांश पहाडी भागांमध्ये बर्फवृष्टीमुळे ही स्थिती निर्माण झाली होती.

तेथील गारठायुक्त वारे विदर्भाच्या दिशेने येत असल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. यामुळे विदर्भातील सर्वच शहरांतील तापमानात मोठी घट झाल्याचे दिसून आले होते. सायंकाळ झाली की हवेत गारवा वाढत होता. पहाटेच्या सुमारास थंडीची तीव्रता अधिक जाणव होती.

मात्र, अचानक तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे कालपासून थंडीचा जोर कमी झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे गेल्या चोवीस तासांत नागपूरच्या किमान तापमानात तब्बल सहा अंशांनी वाढ होऊन पारा १८.३ अंशांवर गेला आहे. इतरही शहरांतील तापमान दोन ते सहा अंशांनी वाढले आहे. कमाल तापमानातही लक्षणीय वाढ दिसून आली आहे.

विदर्भात जोरदार पावसाची शक्यता नसली, तरी पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची दाट शक्यता आहे. विशेषतः गडचिरोली जिल्ह्यात पाऊस अपेक्षित आहे. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहेत. ढगांची दाटी कमी झाल्यानंतर पुन्हा थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कडाक्याच्या थंडीची शक्यता

थंडी वाढत चालल्याने हळूहळू स्वेटर्स, मफलर्स व कानटोपरे बाहेर पडू लागले होते. स्वेटर विक्रेत्यांच्या दुकानांवरही ग्राहकांची गर्दी झाली होती. हवामान विभागाने यंदाही विदर्भात कडाक्याच्या थंडीची शक्यता वर्तविली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: दोन दिवसांच्या मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजारात जोरदार उसळी! कोणते शेअर्स ठरले टॉप गेनर्स? पाहा आजचे IPO अपडेट

राज्यात अवयव प्रत्यारोपण झाले दुप्पट; राज्य सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी

Latest Marathi News Live Update : स्वीकृत नगरसेवक पदासाठी एक वर्षाचा फॉर्म्युला; भाजप-शिंदे सेनेत मोठी स्पर्धा

Court News: जिजूने छेड काढली म्हणून गोंधळ; कोर्टात मेहुणीची धक्कादायक कबुली... “ते फक्त स्वप्न होतं!” ७ वर्षांनी एअरफोर्स जवान निर्दोष

भाईजानचं चाहत्यांना गिफ्ट! नव्या चित्रपटाची जोरदार चर्चा, सलमान साऊथच्या दोन अभिनेत्रीसोबत दिसणार

SCROLL FOR NEXT