code of conduct applicable for grampanchayat election in yavatmal
code of conduct applicable for grampanchayat election in yavatmal 
विदर्भ

ग्रामपंचायतींवरील वर्चस्वाची रणधुमाळी सुरू, आचारसंहिता लागू

चेतन देशमुख

यवतमाळ : जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजल्याने संबंधित भागांत निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. येत्या 15 जानेवारीला ग्रामपंचायतींसाठी मतदान केले जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सत्ता केंद्रांवर आपापले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला आतापासूनच सुरुवात करण्यात आलेली असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. 

कोरोनामुळे गेल्या मार्च 2020मध्ये होणाऱ्या पहिल्या टप्प्यामधील जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केलेल्या होत्या. त्यानंतर आता पहिल्या व दुसऱ्या टप्प्यामधील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा एकत्रित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केलेला आहे. एकूण दोन टप्प्यांत जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतींच्या होणाऱ्या निवडणुका आता एकाच वेळी घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार 2022मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्यादेखील सार्वत्रिक निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्याअनुषंगाने पुढील तयारी म्हणून ग्रामपंचायती आपल्या ताब्यात राहाव्यात, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. 

जिल्ह्यात काँग्रेस, शिवसेना, भाजपनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड आहे. राज्याच्या राजकारणापासून महाविकास आघाडीचा प्रयोग सुरू झाला आहे. तसाच प्रयोग हा यवतमाळ जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींमध्येदेखील होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टीने स्थानिकांना तसे अधिकारदेखील देण्यात आलेले आहेत. गेल्या काळात राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींवर 'कमळ' फुलले होते. ते बाजूला करण्यासाठी आता 'त्या' गावांमधील विरोधकांनी कंबर कसलेली दिसून येत आहे. ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारयादीचा कार्यक्रमदेखील सुरू झालेला आहे. त्यामुळे येत्या 15 जानेवारीला एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे 980 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी संगणकीकृत पद्धतीने प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

निवडणूक कार्यक्रम -

  • तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे - 15 डिसेंबर
  • नामनिर्देशनपत्रे सादर करण्याची मुदत - 23 ते 30 डिसेंबर
  • नामनिर्देशनपत्र मागे घेणे - 4 जानेवारी 2021
  • निवडणूक चिन्ह, अंतिम उमेदवार यादी - 4 जानेवारी 
  • मतदान - 15 जानेवारी 2021
  • मतमोजणी - 18 जानेवारी 2021
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

LSG vs MI IPL 2024 Live : मुंबईच्या गोलंदाजांनी केला टिच्चून मारा; लखनौचा निम्मा संघ गारद, सामन्यात रंगत

SCROLL FOR NEXT