Cold increased in vidarbha region Vidarbha marathi batmya  
विदर्भ

अख्ख्या विदर्भात थंडीची लाट; नागरिकांच्या अंगात भरली हुडहुडी; शहरातही ठिकठिकाणी पेटल्या शेकोट्या

दशरथ जाधव

आर्वी (जि.वर्धा) : गत चार दिवसांपासून पडत असलेल्या कडाक्‍याच्या थंडीमुळे परिसर गारठलेला आहे. हुडहुडी भरणारी थंडी वाढतच आहे. परिणामी ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातसुद्धा जागोजागी शेकोट्या पेटतांना दिसून येत आहे.

चार दिवसापूर्वी अचनक पावसाचे आगमन झाले आणि त्यानंतर वातावरणात गारठा निर्माण झाला. पडत असलेल्या कडाक्‍याच्या थंडीपासून बचाव करण्याकरिता सायंकाळच्या पाच वाजता पासूनच शहरातील नागरिक घरात बंदिस्त होत आहेत. कामगार बोचऱ्या थंडीत अंगात भरलेली हुडहुडी दूर करण्याकरिता ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून गप्पा मारत बसलेले आढळतात.

तापमानाचा पारा 27 अंशावरून अचानक 10 अंशापर्यंत खाली आला आणि कपाटात बंदिस्त असलेले स्वेटर, मफलर, कानटोपरे, हातामोजे, पायमोजे, दुलाई ब्लॅंकेट आदी उबदार वस्तू बाहेर निघाल्या. रात्री पारा खाली आला की वातावरणातील गारवा वाढतो आणि ग्रामीण भागातील शेतात, गावातील चौकाचौकात आणि घराघरासमोर शेकोट्‌या पेट घेतात. 

हळूहळू उब घेण्याकरिता शेकोटी लगत गर्दी जमते ग्रामपंचायत निवडणुका असो, रस्त्याचे उद्‌घाटन असो वा शेतकऱ्यांचे आंदोलन यावर जोरदार चर्चा झडतात. वातावरण विश्‍लेषांकानी अजून काही दिवस तरी ही बोचरी थंडी जाणार नाही असा अंदाज वर्तवीला आहे. मात्र थंडी बोचरी असली तरी या निमित्त लोक एकत्र येतात ही जमेची बाजू आहे.    

गहू-हरभरा जोमात

काश्‍मीर खोऱ्यात गत काही दिवसांपासून होत असलेल्या बर्षवृष्टीमुळे उत्तरेकडून येत असलेल्या थंड वाऱ्याने परिसरातील तापमानात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. या हाड गोठवणाऱ्या थंडीत गहू व हरभऱ्याकरिता पिकाला पोषक ठरत असून पीक जोमात आहे. यांमुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. रात्री थंडीतसुद्धा ओलित करण्याकरिता शेतकरी शेतात जाताना दिसून येत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duplicate Voter Detection : राज्य निवडणूक आयोग संभाव्य दुबार मतदार कशाच्या आधारावर ठरवणार?

Ahmadpur Crime : अहमदपूर तालुक्यातील रुद्धा गावात पिता पुत्राचा अज्ञात हल्लेखोरांकडून निर्घुन खून

Maharashtra Police : श्रीशैल्य चिवडशेट्टी बारामतीचे नवीन पोलिस निरिक्षक

Eknath Khadse : खडसेंच्या मुक्ताई बंगल्यातील चोरीचा पर्दाफाश! आंतरराज्यीय टोळीचा सहभाग, सोने घेणारा सराफ अटकेत

निशिगंधा वाड यांची लेक अभिनय क्षेत्रात येणार? दीपक देऊळकर म्हणाले, 'माझी मुलगी गोल्ड मेडलिस्ट पण...

SCROLL FOR NEXT