Cold snap again in Gadchiroli district 
विदर्भ

गारठा वाढला : गडचिरोली जिल्ह्यात थंडीने पुन्हा धरला जोर

अशोक कुम्मरी

सिरोंचा (जि. गडचिरोली) : काही दिवसांपूर्वी वातावरणात बदल होऊन उबदार वातावरण जाणवत असताना आता आठवड्यापासून पुन्हा थंडीने जोर धरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत पुन्हा शेकोट्या पेटू लागल्या आहेत. विशेषत: जिल्ह्याच्या दक्षिणेकडील शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्‍यात थंडीची तीव्रता अधिकच वाढली आहे.

वातावरणातील काही प्रमाणात कमी झालेली थंडी मागील दोन-तीन दिवसांपासून पुन्हा परतली आहे. रात्रीच्या तापमानात घट झाल्याने अनेक ठिकाणी हुडहुडी भरली आहे. साधारणत: जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून दिवसाचे तापमान वाढण्यास प्रारंभ होते. यावर्षी तशी चाहूलही लागली होती. काही दिवस तापमानामध्ये वाढही नोंदविण्यात आली. मात्र, जानेवारी महिना संपला आणि फेब्रुवारी प्रारंभ झाला, तरी पुन्हा थंडी कमी होण्याऐवजी वाढण्यास प्रारंभ झाला आहे.

तापमान मोठ्या प्रमाणात कमी झालेले दिसून येत आहे. रात्री व सकाळच्या सुमारास नागरिक शेकोटीचा आधार घेताना दिसून येत आहेत. अधूनमधून येणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे गेल्या पंधरवड्यात थंडी टप्याटप्यात कमी होत गेली. ढगाळ वातावरणाने दुपारच्या सुमारास उकाडा वाटत होता, ढगाळ वातावरण दूर होताच मागील दोन-तीन दिवसांपासून पुन्हा थंडीने जोर पकडला आहे. त्यामुळे अनेक नागरिक उबदार कपडे घालून घराबाहेर पडत आहेत.

थंडीचा जोर आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे मकरसंक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू झाले की, आता थंडी कमी होऊन तापमानात वाढ होईल, असे मानले जाते. पण, यंदा उलटेच घडताना दिसत आहे. त्यामुळे थंडीचा कडाका सहन करणाऱ्या नागरिकांना पुन्हा काही दिवस हे हुडहुडी भरविणारे दिवस सहन करावे लागतील, असे दिसून येत आहे.

वृक्षतोडही वाढली

थंडीच्या दिवसांत गरम पाणी व शेकोटीसाठी लाकडांची मागणी वाढते. सरकारने उज्ज्वला गॅस योजनेतून गॅस शेगडीचे कनेक्‍शन दिले असले, तरी सिलिंडर रिफीलिंगचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गरीब नागरिक पुन्हा जंगलावरच अवलंबून राहू लागले आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाघांचा वावर असतानाही नागरिक जिवावर उदार होऊन सरपणासाठी जंगलात जाताना दिसून येत आहेत. त्यामुळे वृक्षतोडही वाढल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction to Sheikh Hasina death sentence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची पहिली प्रतिक्रिया!

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

SCROLL FOR NEXT