cold 
विदर्भ

नववर्षाचे स्वागत थऽ थऽऽ थंडीने

सकाळ वृत्तसेवा

अकोला : यंदा नववर्षाची सुरुवात थऽ थऽऽ थंडीने होणार असून, दोन आठवड्यांमध्ये घोठवणाऱ्या थंडीचा अनुभव अकोलेकरांना येणार आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर का होईना, तीन दिवसांपासून कुडकुडणाऱ्या आणि बोचऱ्या थंडीचा अनुभव अकोलेकरांना येत असून, पुढील काही दिवसात पारा पाच अंशाखाली जाण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक ऋतू हा अकोल्याला एक नवी ओळख देऊन जात आहे. कधी उन्हाळ्यात 49 अंश सेल्सिअस तापमानाचा तडाखा तर, कधी आखूड आणि लांबलेला पावसाळा अकोलेकरांनी अनुभवला आहे. यावर्षी सुद्धा ऋतूचक्रातील बदलाचा असाच अनुभव घेत, सप्टेंबरमध्ये तीव्र उन्हाचे चटके, आक्टोबर अखेरपर्यंत झोडपून काढणारा पाऊस आणि आता डिसेंबर अखेर हुडहुडी भरविणाऱ्या थंडीचा सामना करावा लागणार आहे. 

8.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
महिनाभरापासून जिल्ह्यात हवामान बदलामुळे ढगाळलेले आणि गर्मीचे वातावरण होते. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून तापमानात अचानक घसरण झाली असून, रविवारी (ता.29) किमान 8.6 आणि कमाल 24.4 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. पुढील काही दिवसात तापमानात अजून घसरण होऊन पारा पाच ते सहा अंशाखाली जाण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

पुढील दोन आठवडे विदर्भात शीत लहर
काश्मिर, उत्तर भारतात मोठा प्रमाणात बर्फवृष्टी होत असून, महाराष्ट्रात शीत वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे तीन ते चार दिवसांपासून वऱ्हाडासह विदर्भात किमान तापमान घसरले आहे. पारा पाच ते आठ अंशावर आला आहे. नववर्षाची सुरवात यंदा कुडकुडणाऱ्या थंडीनेच होणार असून, पुढील दोन आठवडे अकोल्यासह विदर्भात शीत लहर राहू शकते.
-संजय अप्तूरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर

अशी घ्या काळजी
* नित्य व्यायाम करावा
* आहारात पालेभाज्या, फळे, दूध व मोड आलेले कडधाण्य घ्यावे
* शिळे तसेच उघड्यावरचे तळलेले पदार्थ खाणे टाळावे
* हात स्वच्छ धुवावे
* गर्द रंगाचे व गरम कपडे घालावी
* अती शीत पदार्थ खाणे टाळावे
* संसर्गजन्य आजार बाधीत रुग्णांचे कपडे, टॉवेल वापरू नये
* वृद्ध, लहान बालके व रुग्णांनी रात्री उशिरा बाहेर पडणे टाळावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 3rd ODI: 'चेस मास्टर' विराट कोहली लढला अन् विश्वविक्रमी सेंच्युरीही ठोकली; मालिका विजयासाठी भारताच्या आशा जिवंत

Mumbai Firing Incident : मोठी बातमी! मुंबईत गोळीबाराची घटना, सोसायटीवर फायरींग करत आरोपी फरार

Pune Political Shift : शरद बुट्टेपाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार; उत्तर पुण्यात भाजपला मोठा धक्का!

Haveli Taluka Elections : हवेली तालुक्यात निवडणुकीत बदलती समीकरणे; विकास की देवदर्शन?

IND vs NZ, 3rd ODI: विराट कोहलीच्या अर्धशतकाआधीच न्यूझीलंडच्या कर्णधाराने अचानक का सोडलं मैदान? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT