collector akola.JPG 
विदर्भ

जिल्हाधिकारी म्हणाले नावालाच उघडतात दवाखाने...

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना आपत्तीच्या या काळात डॉक्टरांनी दवाखाना उघडणे आवश्यक आहे. काही डॉक्टर नावाला दवाखाना उघडून कंपाऊंडरला बसवून रुग्णांना परत पाठवत आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने उघडून रुग्णसेवा करावी. त्यांना कोरोना संशयित रुग्ण आढळल्यास त्याला वाऱ्यावर न सोडता शासकीय आरोग्य यंत्रणेच्या हवाली करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील डॉक्टरांना केले आहे. 

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढत आहे. त्यामुळे शासन व प्रशासनामार्फत विविध स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु या आपत्तीच्या काळात खासगी डॉक्टरांना रुग्णसेवा सुरुच ठेवण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यातील खाजगी डॉक्टर्सने त्यांच्या सेवा सुरु करुन समाजात दिसणारे संशयित कोवीड रुग्ण ओळखून ते शासकीय रुग्णालयांकडे तात्काळ पाठवल्यास कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. परंतु खासगी दवाखानेच बंद असल्याने कोरोना संशयित रुग्णांची माहिती प्रशासनला मिळत नाही आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या आयएमए संघटनेची शुक्रवारी (ता. 1) जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने, रुग्णालये तात्काळ सुरु करुन रुग्णसेवा सुरु ठेवावी, अन्यथा खाजगी डॉक्टर्सच्या सेवा अधिग्रहित करण्यात येईल, असा इशारा डॉक्टरांना दिला.

बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता  डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसोले, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सहाय्यक आयुक्त अन्न व औषधे मेतकर तसेच अन्य अधिकारी व आयएमए संघटनेचे पदाधिकारी व डॉक्टर्स उपस्थित होते.

डॉक्टरांनी मांडल्या अडचणी
बैठकीत सुरुवातीला उपस्थित खासगी डॉक्टरांनी सूचनांसह त्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी काही डॉक्टर्सने कम्युनिटी दवाखाने वेगवेगळ्या भागात सुरु करण्याबाबतचा उपायही सुचविला. तसेच ६० वर्षे वयावरील डॉक्टर्सना या अत्यावश्यक सेवेतून वगळावे, इन्श्युरन्स  सुरक्षा द्यावी, प्रतिबंधित क्षेत्रातील कर्मचारी वर्ग येऊ देण्याबाबत, अत्यावश्यक साहित्य व औषधे मिळण्याबाबत निर्माण होणाऱ्या अडचणी याबाबत समस्या मांडल्या. खासगी डॉक्टरांच्या तांत्रिक बाबींबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण व अधिष्ठाता डॉ. घोरपडे यांनी मार्गदर्शन केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT