file photo 
विदर्भ

कोरोना काळातही विद्यार्थ्यांना आधार नोंदणीची सक्ती, सरकारचा अजब कारभार

प्रभाकर कोळसे

नंदोरी (जि. वर्धा) : राज्यात शिक्षण विभागात सरल प्रणालीतून काम सुरू झाले आहे. या प्रणालीत नोंदणी करताना विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक आवश्‍यक असल्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या होत्या. या नोंदी करताना शाळांकडून काही चुकीचे तर काही ठिकाणी एकाच आधाराची दुबार नोंदणी केल्यामुळे एकच विद्यार्थ्याला दुबार लाभ मिळाल्याचे पुढे आले आहे. यामुळे येत्या ३१ मार्चपर्यंत सर्वच शाळांना आधार नोंदणी करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत राज्यात १ लाख १० हजार ३१५ शाळांत पहिली ते बारावीचे २ कोटी २५ लाख ६० हजार ५७८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना शालेय पोषण आहार, राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना, मोफत गणवेश योजना, मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ दिला जातो.

योजनेचा लाभ देताना शासनाकडे लाभास अनुदेय विद्यार्थ्याची परिपूर्ण माहिती सरल संकेतस्थळावर उपलब्ध असण्याच्या दृष्टीने आणि संबंधित लाभाचे दुबार प्रदान रोखण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक विभागाच्या सरल प्रणालीत नोंदविणे आवश्‍यक आहे.

शासनाचे शाळाना दिले आदेश

कोविड-१९ प्रसाराचे पार्श्वभूमीवर शाळा सुरू होईपर्यंत आधार नोंदणीकरिता राज्यात उपलब्ध असलेल्या पर्यायी व्यवस्थेचा वापर करून इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी आणि सरलमध्ये अद्ययावतीकरण करण्याचे काम शाळांनी ३१ मार्च २०२१ पर्यत करण्याचे आदेश शासनाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी शिक्षण आयुक्त, विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राथमिक यांना दिले आहेत.

६४ लाख ५९ हजार विद्यार्थी आधारविना

सद्यःस्थितीत ६५ लाख ५९ हजार ३८८ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल प्रणालीत नोंदविणे प्रलंबित आहे. काही विद्यार्थ्यांची दुबार नोंदणी झाल्याचे लक्षात आले आहे. काही अस्तित्वात नसलेले आधार क्रमांक नोंदणी झाल्याचे लक्षात आले आहे. या सर्व बाबींवर आळा घालण्यासाठी सर्व मुलांचे आधार क्रमांक नोंदवून त्याची खात्री होणे आवश्‍यक आहे.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT