aadhar 
विदर्भ

संतापजनक! आधार लिंकिंगसाठी गरीबांकडून उकळले पैसे

निलेश झाडे

धाबा(जि. चंद्रपूर) : संगणक चालक असलेल्या ग्रामपंचायत सदस्याने संगणक संच आपल्या मालकीच्या कृषी केंद्रात नेला आणि एवढ्यावरच न थांबता पंतप्रधान आवास योजनेचा लाभार्थ्यांचे विनामुल्य आधार लिंकिंग न करता त्यांनी प्रत्येक लाभार्थ्याकडून 60 रुपये उकळल्याचा संतापजनक प्रकार गोंडपिपरी तालुक्‍यातील धाबा येथे घडला आहे. लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतीकडे याबाबत तक्रार केली आहे. कोरोना संकटात या बेरोजगार गरीब लाभार्थ्यांची लूट करणाऱ्या या प्रकारावर सर्वस्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

गोंडपिपरी तालुक्‍यात येणाऱ्या धाबा येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी पाचशे लाभार्थ्यांची ड यादी ग्रामपंचायतीला प्राप्त झाली. या यादीतील प्रत्येकच लाभार्थ्याचे आधार लिंकींग करायचे होते. यासाठी शासनाकडून कुठल्याही प्रकारचे देय आकारण्यात आलेले नाही. असे असतांना ग्रामपंचायतचे संगणक चालक शालिनी सांगडे यांनी प्रत्येक लाभार्थ्याकडून 50 ते 100 रुपये उकळल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे.

काही लाभार्थ्यांनी जाब विचारला असता मी समाजसेवा करायला बसलेली नसल्याचे उत्तर त्यांनी दिले. शालिनी सांगडे या ग्रामपंचायत सदस्य आहेत. विरोध केल्यास आपले घरकुल नामंजूर केल्या जाईल या भितीने लाभार्थी गप्प होते. विशेष म्हणजे ग्रामपंचायतेतील संगणक कक्षात बसून आधार लिंक करायची होती. मात्र सांगडे यांनी संगणक कक्षातील संच थेट आपल्या मालकीच्या कृषी केंद्रात नेवून ठेवला. कृषी केंद्रातूनच त्या कारभार करायच्या. या प्रकाराला वैतागलेल्या लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली.
ग्रामपंचायतीने 22 जूनला झालेल्या मासिक सभेत शालिनी सांगडे यांना निलंबित करण्याचा ठराव घेतला आहे.


सविस्तर वाचा - हुंडाबळी! सुनेपेक्षा कार झाली मोठी, शारीरिक व मानसिक त्रास अन...

तर आमरण उपोषण ....!
गरीब लाभार्थ्याकडून पैसे उकळणाऱ्या संगणक चालकावर तात्काळ कार्यवाही करा अन्यथा आमरण उपोषण करू असा इशारा विश्वेश्वर हीवरकर,संजय चंदनगिरीवार,राकेश चंदनगिरीवार,दिपक येलमुले,रविंद्र येलमुले,संजय हिवरकर,गजानन हिवरकर,विनोद भुसारी,रुपेश नेवारे या लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतीला दिलेल्या तक्रारीत केला आहे.

निलंबित करणार
संगणक चालक लाभार्थ्याकडून पैसे उकळत असल्याची तक्रार ग्रामपंचायतीला प्राप्त झाली. मासिक सभेत या तक्रारीवर चर्चा करण्यात आली. संगणक चालकाला निलंबित करण्याचा ठराव घेण्यात आला आहे.
रोशनी अनमुलवार,सरपंच धाबा  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT