The concept that corona protects from its concept is evolved 
विदर्भ

त्याच्या संकल्पनेतून साकारले कोरोनापासून बचाव करणारे हे यंत्र

श्रीनाथ वानखडे

मांजरखेड (जि. अमरावती) :  सध्या कोरोनाने थैमान घातले असताना तो रोखण्यासाठी देशविदेशात संशोधन सुरू आहे. वर्धा येथील युवा संशोधक महेश बाहुटे याने घरी बसल्या बसल्याच केवळ अडीच हजार रुपये खर्च करून सॅनिटायझर स्प्रे मशीन बनविली आहे. भावाच्या औषधांच्या दुकानातल्या गर्दीच्या समस्येवर तोडगा म्हणून त्याने ही मशीन तयार केली आहे.

महेश बाहुटे यांच्या मोठ्या भावाचे औषधांचे दुकान आहे. येथे दररोज जवळपास दोनशे ग्राहक येतात. या अत्यावश्‍यक सेवेदरम्यान आपल्या भावासोबतच इतर रुग्णांनासुद्धा विषाणूची बाधा होवू नये म्हणून महेश सतत प्रयत्नशील होता. आपणसुद्धा या समाजाचे देणे लागतो, सोबत अत्यावश्‍यक सेवा देत असलेल्या भावाच्या कार्यात आपले सहकार्य म्हणून त्याच्या डोक्‍यात नानाविध कल्पना येत होत्या. महेश स्वतः इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअर असल्याने त्याच्या घरी काही वस्तू उपलब्ध होत्या व काहीं मित्राच्या माध्यमातून गोळा केल्या.

घरातील स्प्रे मशीनचे नोझल, प्रेशर पंप, बॅटरी, लोखंडी फ्रेम व मेटल कॅनचा उपयोग करून घरीच सॅनिटायझर स्प्रे मशीन तयार करण्यात आली. विशेष म्हणजे या सर्व वस्तूंसाठी केवळ अडीच हजार रुपये खर्च आला. घरात शिरताना फ्रेममध्ये पाय ठेवण्याच्या जागेवर पाय ठेवल्यास पायाच्या दाबाने हा पंप कार्यान्वित होतो. दोन्ही हात वर करून यातून प्रवेश केल्यावर सॅनिटायझरचा फवारा अंगावर उडतो त्यामुळे व्यक्तीचे निर्जंतुकीकरण होते.
यापूर्वीही महेशच्या संशोधनाचे कौतुक झाले आहे. औरंगाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान प्रदर्शनामध्ये महेशने सहभाग घेऊन स्वयंचलित जडवस्तू वहन मशीनचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाला उपस्थित मुख्यमंत्री व इतर मान्यवरांनी त्याचे कौतुक केले होते. यापूर्वी ही ऑटोमेशन, मोबाईलवर घरगुती उपकरणांचे नियंत्रण, मोशन सेन्सरवर त्याने संशोधन केले आहे. या कठीण प्रसंगात पोलिसांना या विषाणूची लागण होवू नये म्हणून पोलिस स्टेशनला सॅनिटायझर स्प्रे मशीन गिफ्ट देणार असल्याचे महेश बाहुटे याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनचे शतक अन् CSK ची मुंबईत घुसून दादागिरी! आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, गुणतालिकेत मोठी उलथापालथ

Video Viral : येडे गबाळे! PSL च्या टॉसच्या वेळेस मारामारी, डेव्हिड वॉर्नरला काय चाललंय कळेना... हसावं की पळावं? झाला कन्फ्युज...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार! महिलांकडून वसुली पूर्ण, पण पुरुषांवर निर्णय प्रलंबित का?

West Bengal Voting : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल-तामिळनाडूत विक्रमी मतदान, निवडणूक आयोगाचा मतदारांना सलाम

Sanju Samson Century: १० चौकार, ६ षटकार! संजूच्या शतकाने मोडले अनेक विक्रम; रोहित शर्माशी बरोबरी, गिलख्रिस्टवर पडला भारी

SCROLL FOR NEXT