विदर्भ

शेतकऱ्यांना पीककर्जाची चिंता; जिल्हा बॅंकेने केले ४४७ कोटींचे वाटप

चेतन देशमुख

यवतमाळ : पीककर्ज (Peak loan) वाटपासाठी प्रशासनाकडून बॅंकांना कोट्यवधींचे टार्गेट (Banks target billions) दिले आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पीककर्ज मिळविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जिल्ह्यातील शेतकरी (Farmers) पुन्हा एकदा खरीप हंगामात पेरणी करण्याच्या तयारीला लागलेले आहेत. राष्ट्रीयीकृत, खासगी बॅंकांच्या तुलनेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची कर्जवाटपाची गती अधिक आहे. मे महिन्यात उद्दिष्ट्यांच्या ७० टक्के पीककर्जाचे वाटप जिल्हा सहकारी बॅंकेने केले आहे. (Concerns of crop loans to farmers for sowing)

यंदाच्या हंगामातदेखील बॅंकांनी अडवणुकीचे धोरण अवलंबिले असून, कासवगतीने पीककर्ज वाटप होत आहे. आतापर्यंत केवळ २५ टक्‍के पीककर्ज वाटप झालेले आहे. त्यातही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने पीककर्ज वाटप केल्याने पीककर्ज वाटपाची टक्केवारी वाढली आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांचा परफॉमन्स नेहमीप्रमाणे संथ असाच आहे. वेळेवर धावपळ होऊ नये, म्हणून शेतकरी पीककर्जासाठी बॅंकांचे उंबरठे झिजवीत आहेत. मात्र, त्यांना विविध कारणे दाखवून परत पाठविले जात आहे.

राष्ट्रीयीकृत बॅंकांत सर्वाधिक त्रुटी काढल्या जात असल्याची ओरड आहे. या २०२१-२२साठी राष्ट्रीयीकृत बॅंकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना दोन हजार २१० कोटी रुपयांचे टार्गेट देण्यात आले. आतापर्यंत ७३ हजार १६ शेतकऱ्यांना ५६८ कोटी ५२ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. त्यात जिल्हा बॅंकेने ४४७ कोटी ३६ लाख रुपयांचे वाटप केले.

राष्ट्रीयीकृत बॅंकेने केवळ ७.२० टक्के पीककर्जाचे वाटप केले. ज्या बॅंकेत शेतकऱ्यांचे खाते आहे. त्यांना वेळेत पीककर्ज देण्याचे निर्देश आहेत. प्रत्यक्षात कर्जासाठी आलेल्या शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. निसर्गाचा लहरीपणा, दुबार पेरणी, नापिकी, सावकारी कर्ज, फवारणीचा फास, फसवी ठरलेली कर्जमाफी, शासनाच्या मदतीची पोकळ घोषणा यामुळे शेतकरी देशोधडीला लागले आहेत. त्यात कोणताच हंगाम शेतकऱ्याला साथ देताना दिसत नाही.

घाम गाळून पिकविलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. लागवडीचा खर्च निघत नसल्याने शेती व्यवसाय तोट्याचा ठरत आहे. निराशेच्या गर्तेत सापडलेला शेतकरी यंदातरी उत्पन्न होईल, एकमेव या आशेने खरिपात राबराब राबण्याची तयारी ठेवतो. बॅंकांना ताळ्यावर आणण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निर्देश दिले. असे असतानाही बॅंकांच्या कामाची गती वाढविलेली दिसत नाही.

मध्यवर्तीचे वाटप ७० टक्के

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने यंदाही भरारी घेतली आहे. बॅंकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांच्या नेतृत्वात मे महिन्यातच बॅंकेने ७० टक्के पीककर्जाचे वाटप केले. ही गती कायम राहिल्यास मे महिन्यातच जिल्हा बॅंक शंभर टक्के पीककर्ज वाटपाचे टार्गेट पूर्ण करून नवीन रेकॉर्ड निर्माण करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

बॅंकनिहाय कर्जवाटपाची टक्केवारी

  • राष्ट्रीयीकृत बॅंका - ७.२०

  • खासगी बॅंका - ३.७९

  • विदर्भ कोकण - १३.९५

  • जिल्हा बॅंक - ७०.१३

(Concerns of crop loans to farmers for sowing)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Changur Baba : अंगठ्या अन् रत्न विकायचा, ५ वर्षात जमवली १०० कोटींची माया; धर्मांतर रॅकेट प्रकरणी अटक केलेला छांगुर बाबा कोण?

बौद्ध धर्मगुरू दलाई लामांना 'भारतरत्न' देण्याची मागणी; 80 खासदारांनी केली पाठिंबा दर्शवणारी स्वाक्षरी, मोदी सरकार घेणार लवकरच निर्णय?

Guru Purnima 2025 Greeting Card: गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंसाठी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, जाणून घ्या सोपी पद्धत

Oxford Graduate: ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पदवीधर करतोय फूड डिलिव्हरी; दरमहा कमावतोय लाखो रुपये, म्हणाला...

Solapur Crime: निर्दयी मुलाने बापाला चाबकाचे फटके देऊन संपविले, घरात रक्ताचा पाट वाहिला तरी...सोलापूर हादरले !

SCROLL FOR NEXT