file photo 
विदर्भ

निष्कर्ष! सांडांमुळे रस्त्यांवरील गायींना हिंमत! 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गायींचे कळप दिसून येत असून, त्यांच्यामुळे अपघातही होत आहेत. परिणामी नागरिकांत महापालिकेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. महापालिकेने रस्त्यांवरून गायी हटविण्यासाठी सांडांवर लक्ष केंद्रित केले आहे. सांडांमुळे गायींना रस्त्यांवर ठाण मांडण्याची हिंमत येत असल्याचा निष्कर्ष महापालिकेने काढला असून, मंगळवारपासून सांड पकडण्याची मोहीम सुरू केली जाणार आहे. 
शहरातील वर्दळीच्या रिंग रोडसह सर्वच प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांनी धुडगूस घातला आहे. यात गाय, सांडांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. रस्त्यांवर गायी, सांडांनी मांडलेल्या ठिय्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या जनावरांना वगळून वाहने चालविताना अपघातात जखमी होत असून, शहरवासींना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मानेवाडा रोड, सुभाषनगर रोड, प्रतापनगर, त्रिमूर्तीनगर, दिघोरी, भांडे प्लॉट, जगनाडे चौक रोड, इंदोरा चौक, कामठी मार्ग, सेंट्रल एव्हेन्यू, अग्रसेन चौक ते कमाल चौक, टिमकी, जागनाथ बुधवारी, उमरेड रोड, भंडारा रोड, छिंदवाडा रोड, अमरावती रोड, वर्धा रोडवर जनावरांमुळे नागरिकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. 
सेंट्रल एव्हेन्यू, वर्धा रोड, हिंगणा रोड, कामठी रोडवर मेट्रो रेल्वेचे काम सुरू असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. त्यात जनावरांनी रस्त्याच्या मध्यभागी ठिय्या मांडल्याने वाहने काढावी कशी, असा प्रश्‍न वाहनधारकांना पडला आहे. रामदासपेठ, धंतोलीसारख्या पॉश वस्तीतील रस्त्यांवरही मोकाट जनावरे दिसून येत आहे. यात गायींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पावसामुळे गायींचा 24 तास मुक्काम रस्त्यांवरच दिसून येत आहे. मात्र, यात सांडांचाही समावेश आहे. गायींच्या तुलनेत सांड अधिक आक्रमक असल्याने वाहनधारकांना वाहने काढताना जीव मुठीत घेऊन पुढे जावे लागत आहे. एवढेच नव्हे हॉर्न वाजविल्यानंतर गायी लवकर प्रतिसाद देतात, मात्र सांड जागा सोडत नाही. एकप्रकारे रस्त्यांवर सांडांचेच साम्राज्य दिसून येत आहे. सांडांमुळे गायीही रस्ता सोडत नाही. त्यामुळे आता महापालिकेने सांडांवरच लक्ष केंद्रित केले आहे. सांड पकडल्यास रस्त्यांवरील गायींची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा महापालिकेचे अधिकारी व्यक्त करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT