congress gives Anirudhh Wankar name for legislative assembly
congress gives Anirudhh Wankar name for legislative assembly  
विदर्भ

विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून विदर्भातील अनिरुद्ध वनकर यांच्या नावावर शिक्कमोर्तब

अथर्व महांकाळ

नागपूर: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष विधान परिषदेसाठी कोणाची नावं निश्चित करतात याची उत्सुकता लागली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी विदर्भातील एकाही नावाला जागा देणार नाही हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र काँग्रेसकडून चंद्रपूरचे अनिरुद्ध वनकर यांचे नाव चर्चेत होते. आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी मिळून १२ जणांची यादी राज्यपाल भगतसिंग  कोश्यारींकडे सोपवली आहे. यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचे प्रत्येकी ४ उमेदवार आहेत. यात विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील गीतकार आणि संगीतकार असलेले अनिरुद्ध वनकर यांचे नाव आहे. 

कोण आहेत अनिरुद्ध वनकर 

अनिरुद्ध वनकर हे साहित्यिक आणि आंबेडकरी चळवळीतील विदर्भातील मोठं नाव आहे. सोबतच ते गीतकार आणि संगीतकारही आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेला बळ मिळतेय. वनकर यांनी तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून एमएफए आणि एमए शिक्षण घेतले आहे. मुंबई विद्यापीठातून लोककला ॲकॅडमीचा डिप्लोमा आणि रामटेक संस्कृत विद्यापीठातून नाट्यकलेचा डिल्पोमा केला आहे. गायक कलावंत म्हणून त्यांची ओळख आहे. आतापर्यंत राज्यभर त्यांनी गायनाचे कार्यक्रम केलेले आहेत. याशिवाय छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा आणि गुजरातमध्येही त्यांनी भरपूर कार्यक्रम केलेले आहेत. १५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते झाडीपट्टी रंगभूमीशी जुळलेले आहेत.

श्री वनकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘घायल पाखरा’चे १०० पेक्षा जास्त कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. याशिवाय धम्माच्या वाटेवर, सुंदर माझे घर, अंधारवाट, वादळाची सावली, रमाई, स्मशान पेटला आहे आदी कलाकृती गाजल्या आहेत. डॉ. प्रकाश बाबा आमटे या सिनेमात त्यांनी भूमिका केलेली आहे आणि गीतकार, संगीतकार म्हणून काम केले आहे. याशिवाय स्टार प्रवाह वाहिनीवर कुलस्वामिनी, झी मराठीवर रंग माझा वेगळा आणि सह्यांद्री वाहिनीवर तिसरा डोळा आणि अग्निपरीक्षा या मालिकांमध्ये काम केले आहे. कलेच्या क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे आहे.

मिळालेले पुरस्कार

अण्णाभाऊ साठे पुरस्कार - १९९७
नेहरू युवा पुरस्कार - १९९८
लोकसूर्य पुरस्कार - २०१६
आंबेडकर रत्न पुरस्कार - २०१६
महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार - २०१६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan: RBIने जाहीर केली गृहकर्जाची धक्कादायक आकडेवारी; गेल्या 2 वर्षात झाली 10 लाख कोटी रुपयांची वाढ

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

Murlidhar Mohol : वाहतूक सक्षमीकरणासाठी मेट्रोचा विस्तार ; मोहोळ यांचे आश्वासन,कोंडीची समस्या सुटण्यास होणार मदत

SCROLL FOR NEXT