congress jairam ramesh over bjp politics lok sabha poll amravati Sakal
विदर्भ

Jairam Ramesh : देशात भाजपाविरोधी लाट, जनता पंतप्रधानांना सत्तेतून अलविदा करणार; जयराम रमेश

देशात एकीकडे भाजपाकडून ४०० पार चा नारा दिला जात असताना दुसरीकडे देशात भाजपा आणि पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रचंड विरोधाची लाट आहे.

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : देशात एकीकडे भाजपाकडून ४०० पार चा नारा दिला जात असताना दुसरीकडे देशात भाजपा आणि पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रचंड विरोधाची लाट आहे. त्यामुळे २००४ ला ज्याप्रमाणे भाजपाने शायनिंग इंडियाची घोषणा केली तेव्हा भाजपा सत्तेवरून पायउतार झाली,

तशीच परिस्थिती आता देशात असून ४ जूनला देशातील जनता पंतप्रधानांना सत्तेतून अलविदा करणार आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय काँगेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी आज (ता.२०) येथे केले.

अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीनिमित्त ते अमरावतीला आले होते, यावेळी त्यांना प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी माजी मंत्री अॅड.यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, प्रवक्ते अॅड. दिलीप एडतकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जयराम रमेश म्हणाले,

पहिल्या टप्प्यातील झालेल्या मतदानातून भाजपा सत्तेमधून आउटगोईंग होणार याचे स्पष्ट संकेत मिळत आहे. दक्षिणेमध्ये भाजपा पूर्णपणे साफ होईल तर उत्तर पूर्वमध्ये अर्ध्यावर येईल, असे स्पष्ट संकेत असून अब की बार ४०० पार ची घोषणा देशातील जनताच अपयशी ठरविणार आहे, असेही ते म्हणाले.

बाबासाहेबांची राज्यघटना बदलवून भाजपा देशात रा.स्व.संघाचा अजेंडा राबविण्याच्या विचारात आहे. आमची लढाई केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून न्यायाची व संविधान वाचविण्यासाठी आहे.

पाच न्यायपत्र आणि २५ गॅरण्टीपत्रासह आम्ही तत्वांनी या निवडणुकीला सामोरे जात असल्याचे जयराम रमेश म्हणाले. काँग्रेसच्या न्यापत्रामध्ये शेतकरी, शेतमजूर, नारीशक्ती, बेरोजगार युवावर्ग, कजमाफी या सर्व बाबींचा समावेश आम्ही केला असून देशातील जनताच त्याला पसंती देईल, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Whatsapp Storage Feature : स्टोरेज सतत फूल होतंय? व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलं जबरदस्त फीचर; एका क्लिकमध्ये मॅनेज करता येणार मोबाईलचा स्पेस

Healthy Life: फक्त सकाळी जिम अन् डाएट करणे पुरेसे नाही, तर हृदयरोगतज्ज्ञांच्या मते 'या' गोष्टींही ठेवल्या पाहिजे लक्षात

दारूच्या ठेक्यावर कारवाई करायला पोलीस गेले, प्यायला गेलेल्यानं कार वेगात पळवली; ५ जणांचा चिरडून मृत्यू, अनेकजण जखमी

Amravati Child Abuse Case : संतापजनक! सावत्र मुलावर बापानं केला लैंगिक अत्याचार; स्वयंपाक घरात नेलं अन् जबरदस्तीनं त्याच्यावर..., आई पाहतच राहिली!

Delhi Tourism: दिल्लीकरांसाठी गुड न्यूज! लवकरच यमुना नदीवर क्रूझ सेवा सुरू, जाणून घ्या कोणते सुविधा मिळणार

SCROLL FOR NEXT