File photo
File photo 
विदर्भ

यवतमाळ मतदारसंघात निवडणूक खर्चात कॉंग्रेस आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील 13 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केल्यापासून ते गेल्या रविवारपर्यंतचा (ता.13) खर्च निवडणूक विभागाकडे सादर केला आहे. त्यानुसार कॉंग्रेस उमेदवारांचा खर्च सर्वाधिक आहे. त्याखालोखाल शिवसेना बंडखोराचा समावेश असून, भाजप उमेदवार तिसऱ्या स्थानावर आहे.
निवडणूक विभागाचा उमेदवारांच्या खर्चावर वॉच आहे. खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांना "शोकॉज' दिल्या जात आहे. उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल केल्यापासून खर्च सादर करणे बंधनकारक आहे. यात रॅली, प्रचासभा, प्रचार कार्यालय, वाहन, नाश्‍ता, जेवण, चहा आदी सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. एका उमेदवाराला 28 लाखापर्यंत खर्च करण्याची मुभा आहे. विजयी रॅली निघेपर्यंतचा खर्च यात दाखवावा लागणार आहे. यामुळे खर्च आटोक्‍यात ठेवण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून सुरू आहे. यवतमाळ विधानसभेत 13 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. त्यांनी सादर केलेल्या खर्चाची तपासणी निवडणूक विभागाकडून सुरू आहे.
13 ऑक्‍टोबरपर्यंत हिशेब पथकांनी तपासला आहे. त्यानुसार सर्वाधिक पाच लाख 65 हजार 770 रुपयांचा खर्च कॉंग्रेस उमेदवार बाळासाहेब मांगूळकर यांचा झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार योगेश पारवेकर यांनी दोन लाख 53 हजार 335 रुपये 11 ऑक्‍टोबरपर्यंत खर्च केले, शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार संतोष ढवळे यांचा खर्च दोन लाख 47 हजार 776 रुपये खर्च दाखविला आहे. भाजप उमेदवार पालकमंत्री मदन येरावार सध्या चौथ्या क्रमांकावर असून त्यांनी दोन लाख 28 हजार 144 रुपये खर्च केले आहेत. यात आणखी वाढ होणार असून कोण उमेदवार किती खर्च दाखविणार याची उत्सुकता आहे.

दररोज होतेय तपासणी
निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना दररोजच्या खर्चाचा हिशेब निवडणूक विभागाकडे सादर करावा लागत आहे. विधानसभा मतदारसंघात असलेल्या खर्च निरीक्षक पथकाकडून तपासणी होत आहे. यात तफावत आढळल्यास उमेदवारांना शोकॉज नोटीस दिली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT