विदर्भ

नाली बांधकामामुळे संरक्षण भिंत कोसळली

सकाळ वृत्तसेवा

सावनेर (जि. नागपूर) : नालीच्या सदोष बांधकामामुळे शिक्षक कॉलनीमध्ये राहणारे गजानन हुडकर यांच्या घराची संरक्षण भिंत कोसळली. त्याच्या घरालगतच नालीचे बांधकाम सुरू आहे. मात्र, नगरपालिकेचा बांधकाम कंत्राटदार निष्काळीपणे व हेकेखोर पद्धतीने काम करीत असल्यानेच भिंत पडून लाखोचे नुकसान झाल्याचा आरोप हुडकर यांनी केला आहे.झालेल्या नुकसानाची नगरपालिका व ठेकेदाराने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. पांढुर्णा मार्गावरील वॉर्ड आठमध्ये नालीचे बांधकाम नागरिकांसाठी अडचणीचे ठरू लागले आहे. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे येथील रहिवाशांना फटका बसू लागला आहे. मागील अनेक दिवसांपासून नालीचे बांधकाम सुरू आहे. यावर नगरपालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. नाली बांधकामात खोदकामानंतर निघालेली माती रस्त्यावर पसल्याने चिखल झाला आहे. त्यावरून चालणेदेखील कठीण झाले आहे. विद्यार्थी व महिलांना याचा सर्वाधिक त्रास सहण करावा लागत आहे. दुसरीकडे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी सर्वत्र शहरात विकासकामाच्या कार्यक्रमांना ऊत आला आहे. कंत्रटदाराच्या निष्काळजीपणा व दिरंगाईमुळेच गजानन हुडकर यांचे नुकसान झाले आहे. नगरपालिका प्रशासनाच्या बांधकाम विभागास सूचना देऊन पडलेली भिंत नगर प्रशासनाने अथवा कंत्रटदाराने बांधून द्यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी एकमुखाने केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT