file photo
file photo 
विदर्भ

त्या घोषणा ठरल्या पोकळ...महिना उलटूनही जमा नाही झाली दोन हजारांची रोकड

सकाळ वृत्तसेवा

नवेगावबांध (जि. गोंदिया) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील बांधकाम कामगारांना आर्थिक साहाय्य देण्याची घोषणा कामगारमंत्र्यांनी 18 एप्रिल रोजी केली होती. या घोषणेला महिना लोटला; तरी अद्यापही नोंदणीकृत बांधकाम मजुरांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा झालेच नाही.

लॉकडाउनच्या काळात इतर व्यवसायाला परवानगी देण्यात आली. मात्र बांधकामाला परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे बांधकाम विभागाशी संबंधित बेलदार, मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या स्थितीत राज्य व केंद्र शासनाकडून लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाउनचा कालावधी पुन्हा वाढविण्यात आला आहे. या कालावधीत राज्यातील इमारत व इतर बांधकामे बंद झालेली आहेत. बांधकाम कामगारांना काम नसल्याने दररोज रोजगार मिळत नाही. त्यामुळे दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागविण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

बैठकीत झालेली चर्चा निष्फळ

लॉकडाउनमुळे हाताला काम नाही. गेल्या दीड महिन्यापासून ते घरी बसून आहेत. बांधकाम कामगारांना भेडसावत असलेल्या अडचणींमध्ये त्यांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी एप्रिलमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, मंडळाकडील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना दोन हजार रुपये आर्थिक साहाय्य थेट बांधकाम कामगाराच्या बॅंक खात्यात DBT पद्धतीने जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

रक्कम लवकर जमा करा

इमारत व इतर बांधकाम कामगारांना बांधकामाची परवानगी देताना विकाससकाकडून उपकर वसूल करून मंडळाकडे जमा करण्यात येतो. मंडळाकडे जमा उपकर निधीमधून नोंदीत बांधकाम कामगारांकरिता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या स्थितीत नोंदीत बांधकाम कामगारांना प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे आर्थिक मदत राज्यातील 12 लाखांपेक्षा जास्त आर्थिक साहाय्य नोंदीत बांधकाम कामगारांच्या बॅंक खात्यात जमा करण्याबाबतचे आदेश महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला देण्यात आले आहेत, असे 18 एप्रिलला कामगारमंत्र्यांनी घोषित केले होते. परंतु जवळपास या घोषणेला महिनाभराचा कालावधी लोटूनही कामगारांच्या बॅंक खात्यावर अजूनही पैसे जमा झाले नाहीत. शासनाने दोन हजार रुपये आमच्या खात्यात लवकरात लवकर जमा करावे, अशी मागणी नवेगावबांध येथील नोंदणीकृत कामगारांनी केली आहे.

आम्ही जगावे कसे?
महिना लोटला मात्र आमच्या बॅंक खात्यात दोन हजार रुपये काही जमा झाले नाही. एक तर बांधकाम सुरू झाले नाही, शासनाने बांधकामाला परवानगी दिली नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जीवनावश्‍यक वस्तूंचेदेखील भाव वाढले आहेत. स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट दर्जाचे धान्य मिळत आहे. मग आम्ही जगावे कसे?
- रूपेश सांगोळकर, बांधकाम मजूर, नवेगावबांध.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT