Lonar Lake sakal
विदर्भ

Lonar Lake : लोणार सरोवराच्या जलपातळीत सातत्याने वाढ; अभ्‍यासकांना चिंता

कमळजा माता मंदिरापर्यंत वाढली पातळी

सकाळ वृत्तसेवा

लोणार : जागतिक पर्यटनस्थळ लोणार सरोवर मधील जल पातळीत सातत्याने वाढ होत आहे. अभ्यासकांनी वाढत्या जल पातळीत बाबत चिंता वर्तवली आहे. परिसरात असलेल्या कमळजा माता मंदिरापर्यंत सरोवराचे पाणी आले आहे. सरोवराच्या जलपातळीत वाढ का होत या बद्दल ठोस कारण अजून समोर आलेले नाही.

जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर हे धार्मिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक दृष्ट्या खूप महत्त्वपूर्ण आहे. यामुळे या ठिकाणी होणाऱ्या प्रत्येक बदलावर सर्व स्तरावर खूप बारकाईने लक्ष ठेवून नोंदी घेतल्या जातात.

काही वर्षांपूर्वी सरोवराच्या पाण्याचा रंग बदलल्याने मोठे कुतूहल निर्माण झाले होते. त्याचाच हा भाग म्हणून सरोवराच्या जलपातळीत सतत वाढ होत असल्याने साहजिकच कुतूहलाचा आणि संशोधनाचा विषय झाला आहे.

आता सरोवराच्या जल पातळीत वाढ होत असल्याने दर्शनासाठी सहज जाता येत असलेली कमळजा माता मंदिर दर्शन स्थळे पाण्याने व्यापलेले दिसत आहे. लोणार सरोवरमध्ये सातत्याने काहींना काही बदल होताना दिसतात.

यामुळे कुतूहलापोटी पर्यटक,भाविक तसेच अभ्यासू नागरिकांची गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे. तसेच सरोवरातील जल पातळीत वाढ होत असल्याने निसर्गप्रेमी व पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. मात्र जलपातळीत नेमकी कशामुळे वाढ झाली आहे हे गूढ अजून उलगडलेले नाही.

विविध प्रश्नाची उपस्थिती

सरोवराच्या जलपातळीत वाढ होत राहिल्यास पाण्याच्या मूळ गुणधर्मामध्ये काही फरक पडेल का, फरक पडल्यास त्याचा सरोवराच्या नैसर्गिक साधन संपत्तीवर ही काही फरक पडेल का, सरोवर परिसरात राहणाऱ्या प्राणी व पक्षांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

लोणार सरोवराच्या पाणी पातळीत वाढ होतच आहे. यामुळे तेथील जैवविविधतेत परिणाम दिसत आहे. याचे अनेक मानवनिर्मित कारणे आहेत. ते वाढू नये यासाठी सरोवर रिंग जवळ कुठले ही खोदकाम व्हायला नको. त्यामुळे पाणी सरोवरात मुरणार नाही. तसेच पावसाळ्यात धारेचे पाणी गावातील लोकांना वापरण्यासाठी प्रतिबंधित करावे.

- सचिन कापुरे, पर्यावरण गतिविधी जिल्हा सहसंयोजक, लोणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT