for controlling corona tobacco will ban in bhamragadh  
विदर्भ

तंबाखू खाणाऱ्यांचे आता होणार हाल..कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विक्रेत्यांनी कसली कंबर.. वाचा सविस्तर 

अविनाश नारनवरे

भामरागड(जि. गडचिरोली) : जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. प्रशासनाकडून कोरोनावर मात करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या उपाय योजना राबवल्या जात आहेत. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही आहे.  प्रशासनाचे निर्देश लक्षात घेत भामरागड किराणा व्यापारी असोसिएशनने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणारे सातत्याने थुंकत असतात आणि थुंकण्यातून कोरोना संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री पूर्णतः बंद करण्याचा निर्णय भामरागड किराणा व्यापारी असोसिएशनने बैठकीत घेतला.  असोसिएशनच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 


व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत निर्णय 

कोरोना संसर्गाचा धोका रोखण्यासाठी तंबाखू, खर्रा, नस, गुडाखू, सिगारेट, बिडी यासारखे तंबाखूजन्य पदार्थ विकण्यावर राज्यासह जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. ही बंदी यशस्वी करणे आपली नैतिक जबाबदारी असल्याचे लक्षात घेत भामरागड किराणा व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. बैठकीला भामरागड असोसिएशनचे अध्यक्ष संतोष बडगे, उपाध्यक्ष महेश कोमकोंटीवार, सचिव सलीम शेख, किशोर भांडेकर यासह इतर सदस्य, मुक्तिपथचे उपसंचालक संतोष सावळकर, तालुका संघटक केशव चव्हाण, प्रेरक चिन्नू महाका, आबिद शेख आदी उपस्थित होते. 

प्रशासनाला योग्य ते सहकार्य करावे 

कोरोना संसर्गाचा धोका तालुक्‍यात व जिल्ह्यात पसरू नये, यासाठी प्रशासनाच्या आवश्‍यक सूचनांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जिल्हा प्रशासनाने तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी लक्षात घेत भामरागड शहरातील दुकानांमध्ये खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ विकणार नसल्याचा निर्णय असोसिएशनने यावेळी जाहीर केला. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सर्व व्यापाऱ्यांनी निर्णयाची अंमलबजावणी करावी व प्रशासनाला आवश्‍यक सहकार्य करावे, असा संवाद साधत सर्व उपस्थित व्यापाऱ्यांना संतोष सावळकर यांनी यावेळी आवाहन केले. 

व्यक्त केला निर्धार... 

हा असोसिएशनने घेतलेला निर्णय खूप महत्त्वाचा असून कोरोना नियंत्रणासाठी यामुळे मदत होणार आहे. जे व्यापारी बैठकीला येऊ शकले नाही त्यांनी ठरलेल्या निर्णयाची माहिती द्यावी, असेही यावेळी सांगण्यात आले. अध्यक्ष बडगे यांनीही सर्व उपस्थितांना आवाहन करत हे भामरागड शहरातील जनतेसाठी उचित पाऊल आहे. आम्ही हा निर्णय नक्‍कीच अंमलात आणू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. 
 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: ''माझ्या प्रकृतीत गंभीर स्वरुपाचे बिघाड, नवीन वर्षात भेटू'' संजय राऊत यांचं पत्र

Parbhani Election: इच्छुकांसह सर्वांनाच आता ११ नोव्हेंबरची प्रतीक्षा; मनपा निवडणूक आरक्षणाचे चित्र सोडतीनंतर होणार स्पष्ट

IND vs AUS 2nd T20I Live: परिस्थिती गंभीर, Abhishek Sharma खंबीर! निम्मा संघ माघारी परतला, पण गडी नाही खचला; २१७ च्या स्ट्राईक रेटने ठोकली फिफ्टी

Latest Marathi News Live Update : शिवसेना महिला पदाधिकारी आक्रमक; रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी

ST Bus Travel: एसटीला लाडक्या बहिणींची साथ! १२ दिवसांत पाच लाखांहून अधिक महिलांचा प्रवास; उत्पन्नात मोठी वाढ

SCROLL FOR NEXT