file photo 
विदर्भ

अमरावतीच्या या भागातही शिरला कोरोना...औषधी विक्रेत्यासह नऊ जणांना लागण

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचे बुधवारी (ता. 17) नऊ रुग्ण आढळून आले. यात औषधी विक्रेता, तीनवर्षीय बालिकेसह सात पुरुष, एका महिलेचा समावेश आहे. दस्तूरनगरलगतच्या मालू-तलडा ले-आउट या नव्या भागात कोरोना शिरला आहे.

श्रीसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून आरोग्य यंत्रणेला प्राप्त झालेल्या अहवालानुसार पहिल्या टप्प्यात स्थानिक गोपालनगर येथील 52 वर्षीय पुरुष, चमननगर (बडनेरा) येथील अनुक्रमे 14 व 17 वर्षीय मुले आणि 31 वर्षीय महिला, बडनेरा मार्गावरील 20 वर्षीय युवक, जुनी वस्ती बडनेरा येथील 43 वर्षीय व्यक्तीसह धनराज लेन सक्करसाथ येथील 3 वर्षीय बालिका, साबणपुरा येथील 29 वर्षीय युवक, स्थानिक दस्तूरनगर भागातील मालू-तलडा ले-आउट येथील 33 वर्षीय, अशा एकूण नऊ व्यक्तींचा कोरोना अहवालसुद्धा पॉझिटिव्ह आलेला आहे.

कोरोनाबाधितांची संख्या 376 वर

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 376 वर पोहोचली आहे. दरम्यान, बडनेरा येथील कोरोना बाधितांची वाढती संख्या नागरिक आणि प्रशासनाची चिंता वाढविणारी ठरत आहे.

आठ रुग्णांना बुधवारी मिळाला डिस्चार्ज

जिल्हा कोविड रुग्णालयात उपचाराअंती बरे झालेल्या आठ व्यक्तींना बुधवारी (ता. 17) डिस्चार्ज देण्यात आला. यात सहा महिला, वडाळी येथील 65 वर्षीय वृद्ध आणि जयस्तंभ चौकातील आठ वर्षीय बालकाचा समावेश आहे. संबंधित महिला रुक्‍मिणीनगर, चावडी चौक-बडनेरा, किशोरनगर, यशोदानगर, अन्सारनगर या भागातील आहेत. आतापर्यंत बरे होऊन डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या 256 झालेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

IND vs AFG: ३२ चेंडूत ८२ धावांच्या खेळीनंतर काय म्हणाला अभिषेक शर्मा? दुबेला २०वी ओव्हर देण्यावर श्रेयस अय्यरचेही स्पष्टीकरण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

कोट्यवधींचं पॅकेज! अमेरिकेत अतिश्रीमंतांच्या घरी जेवण बनवणाऱ्यांना किती पैसे मिळतात?

SCROLL FOR NEXT