Corona Amravati Total 75 corona patience are no more in last 13 days  
विदर्भ

अमरावती जिल्हा कोरोनाच्या विळख्यात; १३ दिवसांत तब्बल ७५ रुग्णांचा मृत्यू; ७ हजारांवर पॉझिटिव्ह

सुधीर भारती

अमरावती : कोरोनाचा ग्राफ वाढतच चालला असून मागील 13 दिवसांत कोरोमानुळे 75 जणांचा बळी गेला असून 6 हजार 997 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

फेब्रुवारी महिन्यापासून रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यात विक्रमी वाढ झाल्यानंतर प्रशासनाकडून लॉकडाउन जाहीर करण्यात आला. दोन आठवड्यांच्या लॉकडाउननंतर पुन्हा उद्योग, व्यवसाय, दुकानांना परवानगी देण्यात आली. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूच कोरोनाचे नवे रुग्ण सापडत आहे. 

1 मार्चला 699 विक्रमी रुग्णांची नोंद झाल्यानंतर प्रशासन चांगलेच हादरले. त्यानंतर सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे. केवळ 9 मार्च ला 282 तर 13 मार्चला 383 एवढी रुग्णसंख्या कमी आली, हे वगळता सर्वच दिवसांत 400 ते 600 च्या संख्येत नवे रुग्ण सापडत आहेत. 

मार्चमध्ये सुद्धा कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. 1 ते 13 मार्चचा कालावधी पाहता 75 जणांचा मृत्यु कोविडमुळे झाला आहे.

1 मार्चपासून मृत्युची संख्या

1 मार्च ः 10, 2 मार्च ः 12, 3 मार्च ः 7, 4 मार्च ः 9, 5 मार्च ः 3, 6 मार्च ः 3, 7 मार्च ः 7 , 8 मार्च ः 7, 9 मार्च ः 3, 10 मार्च ः 6, 11 मार्च ः 6, 12 मार्च ः 2 , 13 मार्च ः 7.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: चीन अन् रशियाकडून अणुचाचण्या सुरु असल्याचा ट्रम्प यांचा दावा; पाकिस्तानचंही घेतलं नाव, चीनकडून प्रत्युत्तर

Jaipur Accident: भीषण अपघात! डंपरची ४० वाहनांना धडक; ५० जणांना चिरडलं, ११ लोकांचा जागीच मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

World Youngest Billionier : वयाच्या 22 व्या वर्षी अब्जाधीश! भारतीय वंशाच्या दोन तरुणांसह तीन मित्रांची अविश्वसनीय कामगिरी

Nashik News : कोवळ्या वयासाठी 'बोल्ड' विषय नको! नाट्य संघांच्या मागणीनुसार हौशी मराठी नाट्यस्पर्धेत लहान मुलांना प्रवेश नाही

Dev Deepawali 2025 Travel Tips : देव दिवाळीला वाराणसीला जाऊ शकत नाही? मग भेट द्या 'या' अद्भुत ठिकाणांना

SCROLL FOR NEXT