नवेगावबांध : शेतात कारली तोडताना मजूर. 
विदर्भ

"कोरोना'मुळे शेतातच सडतो भाजीपाला; उत्पादकांवर आर्थिक संकट

सकाळ वृत्तसेवा

नवेगावबांध (जि. गोंदिया) : मागील महिन्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचे पीक उद्‌ध्वस्त झाले; तर उरले-सुरले पीक व सावरलेले भाजीपाला उत्पादक आता या कोरोनामुळे त्रस्त झाले आहेत. दररोज निघणारा भाजीपाला विकावा कुठे? या संभ्रमात शेतकरी आहेत.

वांगी, मिरची, टमाटर, भेंडी, कारली, कोबी, चवळी, कोथिंबीर आदी भाजीपालावर्गीय पिकांची लागवड सावरटोला, बोरटोला, परसोडी, पांढरवाणी सोमलपूर, गुढरी, देऊळगाव, बोदरा यासह अन्य गावांत करण्यात आली आहे.

भाजीपाला विकण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करा

परंतु, लग्न व इतर सार्वजनिक समारंभावर बंदी असल्यामुळे भाजीपाला उत्पादकांवर संक्रात आली आहे.
लॉकडाउनमुळे मजूर उपलब्ध होत नाही, त्यामुळे शेतातील भाजीपाला मनुष्यबळाअभावी काढला जात नाही. तो शेतातच सडत आहे, तर दुसरीकडे शेतातून निघणारा भाजीपाला विकायचा कुठे? असा दुसरा प्रश्न भाजीपाला उत्पादकांसमोर उभा ठाकला आहे. इकडे आड तिकडे विहीर, अशी परिस्थिती भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची सध्या झाली आहे. परिसरात निघणारा भाजीपाला विकण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी किंवा शीतगृहाची व्यवस्था करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य व भाजीपाला उत्पादक किशोर तरोणे यांनी केली आहे.

भाजीपाला विकायचा कुठे?

शेतात लावलेला भाजीपाला रोज काढल्या जातो. त्याशिवाय पर्याय नाही. बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या शहरात हा भाजीपाला पाठविला जात नाही. भंडारा, गोंदिया, नागपूर अशा ठिकाणी आतापर्यंत शेतकरी आपला भाजीपाला विकत होते. लॉकडाउनमुळे वाहतुकीच्या समस्या असल्यामुळे शेतात रोज निघणारा भाजीपाला विकायचा कुठे? असा गंभीर प्रश्न भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

लाखो रुपयांची वांगी शेताबाहेर फेकली

बाजारात 30 ते 40 रुपये किलो विकला जाणारा भाजीपाला आज पाच-सहा रुपये किलोच्या भावाने विकूनही विकत नाही. त्यामुळे बहुतांश उत्पादक शेताच्या बाहेरच भाजीपाला फेकत असल्याचे वृत्त आहे. बाकटी येथील एका शेतकऱ्याने लाखो रुपयांची वांगी शेताबाहेर फेकल्याची घटना आठ-दहा दिवसांपूर्वी घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"ट्रम्पला ठार मारणे हे आपले कर्तव्य!" ; इराणमध्ये खामेनींच्या अंत्यविधीवेळी चिथावणीखोर घोषणाबाजी, मोठ्या प्रमाणात गर्दी

Nitesh Rane Non Bailable Warrant : नितेश राणेंना गोवा पोलिस अटक करणार? अजामीनपात्र वॉरंट; टोलनाका तोडफोड प्रकरणात न्यायालयाची कारवाई

Ramdas Athawale: ठाकरेंनी रामरक्षा नव्हे तर ‘शिवसेना रक्षा’ आंदोलन करावे; मंत्री आठवलेंचा टोला

AUS W vs ENG W Final: आज महिला टी-20 विश्वचषक फायनल; जाणून घ्या कुठे, किती वाजता अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल मॅच... महामुकाबला

Mumbai Rain News : झाडं रस्त्यावर पडल्यानं बेस्टचा खोळंबा, डझनभर मार्ग बदलले; प्रवाशांचे प्रचंड हाल

SCROLL FOR NEXT