file photo 
विदर्भ

"करोना' ने उडविली  आरोग्य यंत्रणेची झोप 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : सध्या देशात चीनमधून आलेल्या करोना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण आहे. आरोग्य यंत्रणेने सुद्धा सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना "अलर्ट' केले असून संशयास्पद रुग्णांवर नजर ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात अद्याप तरी एकही रुग्ण आढळलेला नाही. 

करोना विषाणुचे काही रुग्ण आढळले

चीनमधील हुबेई प्रांतात करोना विषाणुचे काही रुग्ण आढळले असून मुंबई, दिल्ली व कलकत्ता येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधित देशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनिंग सुरू केले जात आहे. सध्या तरी करोना व्हायरसचा प्रादुर्भाव राज्यात झालेला नसला तरी खबरदारीची उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इन्फ्लूएन्झा सदृश रुग्ण आणि श्‍वसन संस्थेच्या तीव्र प्रादुर्भाव, गंभीर श्‍वसन संस्थेच्या प्रादुर्भावातील प्रोढ व बाल वयोगतील रुग्णांवरविशेष लक्ष राहणार आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे येथे निदानाची व्यवस्था करण्यात आली असून निदानासाठी रुग्णांचे कोणते नमूने घ्यावेत आणि ते प्रयोगशाळेत कसे पाठवावेत, याची माहिती एनआयव्ही पुणे यांच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. हे नमूने जिल्हा शल्य चिकित्सकांच्या माध्यमातून पाठविण्यात येणार आहे.

गंभीर रुग्णांसाठी व्हेन्टीलेटर 

 विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयात गंभीर रुग्णांसाठी व्हेन्टीलेटर तसेच जीवनावश्‍यक प्रणाली सक्षमपणे कार्यरत करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील संशयित रुग्णांची माहिती तातडीने घेण्यात येऊन त्यांचे रक्तनमूने प्रयोगशाळेला पाठविण्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. तसे पत्र आरोग्य संचालक अर्चना पाटील यांच्या कार्यालयामार्फत जिल्हा आरोग्य विभागाला देण्यात आले आहे. 

अशी आहेत लक्षणे

अचानक तीव्र ताप येणे, खोकला व घसा बसणे, दम लागणे, श्‍वास घेण्यास अडथळा, न्यूमोनिया अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेऊन आवश्‍यक त्या तपासण्या करून घेणे गरजेचे आहे. 

देशात तसेच राज्यात कुठेही करोना व्हायरसचा रुग्ण आढळलेला नसला तरी खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य संचालकांकडून देण्यात आल्या आहेत. संशयित रुग्ण दिसल्यास तत्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांना याची माहिती दिली जाईल. अद्याप या व्हायसरचा प्रादुर्भाव झालेला नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र स्वाईनफ्लू सदृश लक्षणे दिसताच तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वच्छता राखणे गरजेच आहे. 
- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Lockdown Strategy : मध्यपूर्वेत तणाव ! भारतात लॉकडाऊन लागणार ? पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचे मोठे विधान

Latest Marathi News Live Update : देशात पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो, ४०० चा सिलिंडर १,१०० रुपयांवर...; ममता बॅनर्जी संतापल्या

Rinku Singh Video: लवकरच येऊन जॉइनिंग लेटर घेईन'; रिंकू सिंहने योगींचे मानले आभार! उपकर्णधारपदाच्या जबाबदारीसह नव्या इनिंगला सुरुवात

Hemant Godse Video Viral : भोंदूबाबा अशोक खरात माजी खासदाराचा हात बघून भविष्य सांगतानाचा व्हिडिओ व्हायरल; लोकसभा निवडणुकीपूर्वी भविष्य जाणून घेतल्याची चर्चा!

OMG! सनी लियोनीचं घर पाहिलत का? लक्झरी पॅलेस पाहून फराह खान झाली शॉक, करोडों खर्च करून बनवलेलं आलिशान घर

SCROLL FOR NEXT