CHADRAMANI NAGAR 
विदर्भ

या गल्लीत कोरोना रुग्ण, अडवली मात्र दुसरीच...मनस्ताप बघा 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : तब्बल 30 लाख लोकसंख्या असलेले नागपूर शहर सोमवार, 8 जूनपासून पुन्हा धावायला लागले. आजवर घरात जणू कोंडून बसलेले जीव घराबाहेर पडायला लागले. रस्त्यावरची वर्दळ वाढली. सरकारी आदेशांचे पालन करीत आजवर बहुतेक लोक घराबाहेरच पडले नसल्यामुळे शहरात काय स्थिती आहे, याची त्यांना माहिती तरी कशी असणार? कोणते रस्ते बंद आहेत, गाडी कोणत्या रस्त्याने न्यायची, याचा काही अंदाजच येत नसल्यामुळे घरून निघाले एका दिशेने आणि मग दिशा वळवून दुसरीकडे जावे लागण्याची पाळी त्यांच्यावर येते नागपूर शहरातील एका नगरात तर रस्त्याचे नियोजन पार बोंबलले आहे. 

चंद्रमणीनगर हे दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघातील क्षेत्र आहे. येथील चौक हा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे. प्रत्येक निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या सभा येथे होतात. या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आणि मोठीच खळबळ उडाली. रुग्ण मिळालेली गल्ली बंद करून तेथे पोलिस बंदोबस्तही लावण्यात आला. लॉकडाउनमुळे व्यवहार, काम, कंपन्या बंद असल्याने लोकं घरीच होती. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळही कमी होती. त्यामुळे या बंद रस्त्याचा त्रास नागरिकांना झाला नाही. 

सोमवारपासून लॉकडाउन पूर्वीप्रमाणेच वाहतूक आणि नागरिकांची रेलचेल सुरू झाली. परंतु रस्त्यांवरील खड्डे आणि कंटेन्मेंटच्या नावाखाली रस्ते अडवण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी मोठा त्रास सहन केला. चंद्रमणीनगर येथे एका गल्लीत कोरोनाचा रुग्ण आढळला. नियंत्रणाच्या नावाखाली संपूर्ण गल्लीच बंद करण्यात आली. तसेच येथील मुख्य रस्त्यावर टिन टाकून संपूर्ण रस्ताच बंद करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांची मोठी अडचण होत आहे. पहिल्या दिवशी नागरिकांना मोठा फेरा मारून दुसऱ्या मार्गाने ये-जा करावी लागत आहे. आजपासून सर्व व्यवहार नियमित सुरू झाले. त्यामुळे लोक आपआपल्या कामाला लागली. या रस्त्याने ये-जा करणारे नियमितपणे आले. त्यांना मार्ग बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना मोठा फेरा घालून दुसऱ्या मार्गाने कामावर जावे लागले. 

नगरसेविका हर्षला साबळे म्हणाल्या...

नगरसेविका हर्षला साबळे म्हणाल्या की, ज्या गल्लीत रुग्ण आढळला, तीच गल्ली बंद करायला हवी. येथील इतर नागरिकांना आजार नसल्याने त्यांना बाहेर ये-जा करण्यासाठी व्यवस्था करण्याची गरज आहे. रस्त्यावर टिन टाकून त्याला बंद करणे योग्य नाही. आता नियमित कामकाज सुरू झाल्याने लोक कामधंद्यावर जात आहेत. हा रस्ता बंद केल्याने नागरिकांची मोठी अडचण होत आहे. ज्यांच्याकडे वाहन नाही त्यांना अधिक त्रास होत आहे. मोठे अंतर कापून त्यांना जावे लागत आहे. नागरिकांच्या कामाची जाणीव ठेवून प्रशासनाने काम करायला हवे, असेही त्या म्हणाल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune District News: वसतिगृहातून तीन अल्पवयीन विद्यार्थी गायब; १८ दिवस उलटूनही ठावठिकाणा नाही, जुन्नर पोलिसांकडून शोध सुरू

Pune FDA Action: पुण्यात FDAची कारवाई, भूम-वाशीतील खवा-पेढा विक्रेते रस्त्यावर; आमदार तानाजी सावंतांकडून प्रश्नाची दखल

रविवारी गुरुचा अश्लेषा नक्षत्रात प्रवेश; 'या' ७ राशींच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी

Nilanga Drought: निसर्गाची अवकृपा अन् कृषी विभागाची आकडेवारी; निलंग्यात खरीप पिकांचे १०० टक्के नुकसान, अहवालात ७० टक्केच नोंद

Latest Marathi News Update : नागपुरातील इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाला डॉ. हेडगेवारांचं नाव

SCROLL FOR NEXT