coronavirus 
विदर्भ

कोरोनाचा आकडा वाढताच! नागपूर आणि अमरावतीत आज आणखी तीन रुग्णांची भर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर/ अमरावती : विदर्भात कोरोना रुग्णांचा आकडा दररोज वाढतोच आहे. लॉकडाऊन जसजसे शिथील होते आहे, तसतशी कोरोनाची भीती लोकांमध्ये वाढतेच आहे. नागपूरात आज आणखी तीन रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागपूरातील कोरोना रुग्णसंख्या आता 625 झाला आहे. अमरावती शहरातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून आज सकाळी आणखी 3 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आता 273 झाली आहे.
6 जून रोजी सकाळी 9.15 वाजता आलेल्या अहवालात वडाळी येथील 65 वर्षीय,
समाधान नगर येथील 37 व अचलपूर तालुक्‍यातील काकडा येथील 23 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
शहरात दरदिवसाला सरासरी 10 कोरोनाबाधित आढळण्याची मालिका कायम असून शुक्रवारी (ता. पाच) दोन पुरुष आणि नऊ महिला, असे एकूण अकरा व्यक्ती कोरोनाबाधित आढळले आहेत.
श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून सकाळी चार आणि दुपारी सात अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यात फ्रेजरपुरा व रुक्‍मिणीनगर येथील अनुक्रमे 35 व 23 वर्षीय महिलेचा समावेश आहे. यापूर्वी या भागात संक्रमित आढळलेल्यांशी या महिला संबंधित आहेत. रुक्‍मिणीनगर येथील खासगी रुग्णालयात वेगळ्या आजाराने उपचारार्थ दाखल 21 वर्षीय मुलगी, तिचे वडील (वय 52), आई (वय 44) यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. औरंगपुरा येथे यापूर्वी पॉझिटिव्ह आढळलेल्या तरुणाची पत्नी (वय22), जलारामनगर येथील रहिवासी व एका फायनान्स कंपनीच्या रोखपालाच्या संपर्कातील मंगलधाम कॉलनीतील युवक (वय 31) तसेच बुधवारा येथील तीन महिला (वय अनुक्रमे 26, 45 व 22) आणि अन्सारनगर येथील 65 वर्षीय महिला यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळले.

सविस्तर वाचा - तुमचे मुंढे तर आमचे डॉ. उपाध्याय, सोशल मीडियावर रंगतोय हा सामना
यासोबत जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 270 वर पोहोचली. लॉकडाउन-5 हा 1 जूनपासून लागू झालेला आहे. 1 ते 5 जून या पाच दिवसांत जिल्ह्यात 51 कोरोनाबाधित आढळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बेलापूरमध्ये पारसिक हिलवरून थेट रुळावर कोसळली कार, १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

Edible Oil Import Duty Cut : सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेल होणार स्वस्त; केंद्र सरकारकडून खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

Mumbaicha Raja: 'मुंबईच्या राजाचं' ऐतिहासिक विसर्जन होणार; मुर्ती अत्याधुनिक बार्ज जहाजावरून थेट पाण्यात उतरवणार

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

Vastu Tips: घरात पितरांचे फोटो कोणत्या दिशेला लावावेत अन् कुठे लावू नयेत? पाहा वास्तुशास्त्राचे महत्त्वाचे नियम!

SCROLL FOR NEXT