relatives Refusal to take body even after five days 
विदर्भ

मृत्यूनंतर रक्ताच्या नात्यांनी फिरवली पाठ, अखेर माणुसकीला जागली खाकी

संतोष ताकपिरे

अमरावती : कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे सख्खी नाती दुरावली आहेत. दिवसेंदिवस प्रकोप वाढत असताना कोरोनाबाधितांना आप्तांनीच नाकारल्याच्या घटना पुढे येत आहेत. याचा सर्वाधिक फटका कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना बसतोय. नात्यातील जिव्हाळा, प्रेम, आपुलकी संपली की काय, असा प्रश्न निर्माण करणारी घटना उघडकीस आली आहे.  

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नातेसंबंधात दुरावा निर्माण होत असल्याच्या अनेक बाबी पुढे येत आहेत. कोरोनाबाधिताच्या मृत्यूनंतर जवळचे काही नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी मृतदेहसुद्धा नेत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.

सोमवारी (ता. 21) कोरोनाबाधिताच्या मृत्यूनंतर पाचव्या दिवशी शहर कोतवाली पोलिस व हिंदू स्मशानभूमी संस्थेच्या पुढाकाराने एका वृद्धावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चांदूरबाजार तालुक्‍याच्या फुबगाव येथील वृद्ध व्यक्तीवर (ता. 80) अमरावतीच्या एका मोठ्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्यानंतर नातेवाइकांनी गुरुवारी (ता. 17) वृद्धास खासगी रुग्णालयातून दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. 

सदर वृद्ध कोरोनाबाधित होता, असे इर्विन रुग्णालयाच्या पोलिसांनी सांगितले. इर्विनमध्ये अवघ्या काही मिनिटांत त्याच दिवशी त्या वृद्धाचा येथे मृत्यू झाला. इर्विनमध्ये दाखल करेपर्यंत नातेवाईक सोबत होते. परंतु मृत्यूनंतर पोलिसांनी मृत वृद्धाच्या नातेवाइकांशी संपर्क साधला असता त्यांनी येण्यास नकार दिला. तसेच पोलिसांनी अंत्यसंस्कार करण्यास हरकत नसल्याचे त्यांनी सांगितल्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बचाटे यांनी स्पष्ट केले.

पाच दिवसांपासून शवागारात दुर्गंधी पसरल्याने येथे काम करणाऱ्या कर्मचारी, डॉक्‍टरसह संबंधित पोलिसांनाही त्रास होत होता, त्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालय शहर कोतवाली हद्दीत येत असल्याने येथील मृत्यूचा मेमो ठाण्यात पोहोचला. अखेर पोलिसांनी हिंदू स्मशानभूमी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता स्मशानभूमीत शवदाहिनीमध्ये टाकून अंत्यसंस्कार पार पाडले.  

शुल्क न आकारता अंत्यसंस्कार
अंत्यसंस्कारासाठी पैसे देण्याची तयारी पोलिसांनी दाखविली होती. जिल्हा शल्यचिकित्सक व हिंदू स्मशानभूमी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिल्यावर त्यांनी शुल्क न आकारता सदर वृद्धावर अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडली.
-शिवाजी बचाटे, पोलिस निरीक्षक, शहर कोतवाली ठाणे, अमरावती

संपादन : अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : गणरायाच्या स्वागताला वरुणराजा हजेरी लावणार! १४-१५ सप्टेंबरला अतिमुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ भागांना फटका

स्मार्ट माहिती : सायबर फसवणुकीत बँकेचीही जबाबदारी

Kelache Ukadiche Modak: उकडीचे मोदक तर सगळेच करतात; यंदा गणेश चतुर्थीसाठी बनवा केळीचे ‘हे’ खास मोदक

आजचे राशिभविष्य - १४ सप्टेंबर २०२६

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

SCROLL FOR NEXT