akola jilha parishad.jpg
akola jilha parishad.jpg 
विदर्भ

CoronaVirus : ‘रिकाम्यांना’ येथे प्रवेश बंदी; वाचा कोणी घेतलाय हा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

अकोला : अनेक लोक एकत्र आल्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाची शक्यता अधिक होत असल्याचे लक्षात घेऊन जिल्हा परिषद अर्थात मिनी मंत्रालयात काम असणाऱ्यांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. सुभाष पवार यांनी शुक्रवारी (ता. 20) स्थायी समितीच्या सभेत दिली. खबरदारीचा उपाय म्हणून दोन पैकी जिल्हा परिषदेचे एक दार सकाळीच बंद करण्यात आले होते. परंतु आता दाेन्ही मुख्य प्रवेश द्वार बंद करण्यात येतील व काम असलेल्यांनाच जिल्हा परिषदेत साेडण्यात येईल, असेही त्यांनी सभागृहात सांगितले.

जिल्हा परिषदेच्या राजश्री छत्रपती शाहू महाराज सभागृहात शुक्रवारी (ता. 20) स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली. सभा सुरू होताच जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुरेश आसोले यांनी काेराेना विषाणूच्या संदर्भात सदस्यांना व उपस्थितांना माहिती दिली. विदेशात थैमान घालणारा सदर रोगाला जागतिक आरोग्य संघटनेने महामारी म्हणून घोषित केले आहे. जगात अनेक नागरिकांचा या विषाणूमुळे मुत्यू झाला आहे. 

जिल्ह्यातील या विषाणूच्या रोगग्रस्तांची त्यांनी सभागृहात माहिती दिली त्यासोबतच खबरदारीच्या उपाययोजना सुद्धा सांगितल्या. सभेला अध्यक्षा प्रतीभा भाेजने, उपाध्यक्षा सावित्री राठाेड, सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, मनिषा बाेर्डे, आकाश शिरसाट, पंजाबराव वडाळ, सदस्य तथा वंचित बहुजन आघाडीचे गट नेते ज्ञानेश्वर सुलताने, शिवसेनेचे गट नेते गाेपाल दातकर, कॉंग्रेसचे चंद्रशेखर चिंचाेळकर, गजानन पुंडकर, डाॅ. प्रशांत अढाऊ, सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गाेहाड यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित हाेते.

सभेवरही दिसला कोरोना इफेक्ट

  •  सभेसाठी प्रवेश करणाऱ्या प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य व अधिकाऱ्यांना सभागृहात हात धुण्याआघी सॅनिटायझरने हात घुवावे लागले. त्यानंतरच त्यांचा सभागृहात प्रवेश देण्यात आला.
  • समाज कल्याण सभापती आकाश शिरसाट व शिक्षण सभापती संपूर्ण सभेत तोंडावर मास्क लावलेले होते.
  • जि.प. परिसरातील गर्दी कमी करण्यासाठी सीईओ डाॅ. पवार यांनी आपण लेखा व वित्त विभागाजवळ असलेले एक मुख्य प्रवेश द्वार बंद केले असल्याची माहिती दिली. त्यासोबतच आता दुसरेही प्रवेश द्वार बंद करण्यात येणार आहे. काम असलेल्या व्यक्तींनाच जिल्हा परिषदेत साेडण्यात येणार आहे, असे सीईओंनी सांगितले.
  • काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व त्यासाठी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला एक कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून मास्कची खरेदी करण्यात येत असल्याची माहिती सुद्धा सीईओंनी यावेळी दिली.
  • काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्याच्या कार्यात आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता आहे. त्यामुळे प्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्याची मागणी शिवसेनेचे सदस्य गाेपाल दातकर यांनी केली.
  • कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी ग्रामीण क्षेत्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना चोविस तास रुग्णालयात कार्यरत राहण्याचे आदेश सीईओंनी द्यावे, अशी मागणी जि.प. सदस्य गोपाल पुंडकर यांनी केली.
  • सभा सुरू झाल्यानंतर सभागृहात विभाग प्रमुख्यांच्या व्यतिरीक्त उपस्थित इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना सभागृहातून निघूण जाण्याचे आदेश सचिव गोहाड यांनी दिले. त्यामुळे सभागृहात मोजकेच अधिकारी व जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT