coronavirus-4923544_960_720.jpg 
विदर्भ

CoronaVirus : अकोल्यातील ‘तो’ दुसरा कोरोना संशयित वाशीमचा

सकाळ वृत्तसेवा

अकोला : वाशीम जिल्ह्यातील एक युवक ऑस्ट्रेलियावरून परतला. त्याची वैद्यकीय तपासणी सर्वोपचार रुग्णालयात सुरू असून, हा अकोल्यातील दुसरा कोरोनाचा संशयित रुग्ण आहे. शनिवारी (ता.14) सकाळीच तो सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाला. त्यावर सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात उपचार सुरू करण्यात आले.

मूळ मालेगाव तालुक्यातील (जि. वाशीम) 33 वर्षीय युवक ऑस्ट्रेलीयामध्ये क्रिकेटचा सामना बघायला गेला होता. ऑस्ट्रेलियातून भारतात परतल्यावर तो त्याच्या मुळ गावी आला. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, गत दोन दिवसांपासून त्याला सर्दी, खोकल्यासह ताप आल्याने तो आजारी पडला. विदेशातून आल्यानंतर प्रकृती बिघडल्याने युवकाने अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात धाव घेतली. त्याला शनिवारी सकाळीच आयसोलेशन वार्डात दाखल करण्यात आले. 

डॉक्टरांनी त्याच्या लाळेचे नमुने घेतले असून, ते वैद्यकीय तपासणीसाठी पुण्याला पाठविले. तपासणीचा अहवाल येण्यास किमान दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. अहवालाची प्रतीक्षा असून, आरोग्य विभाग संशयित रुग्णाच्या प्रकृतीवर लक्ष देऊन आहेत. यापूर्वी 7 मार्च रोजी जर्मनीहून आलेली 24 वर्षीय युवती कोरोनाची संशयित रुग्ण म्हणून दाखल झाली होती. अहवालात कोरोना निगेटीव्ह आल्याने युवतीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती.

एक रात्रभर ‘तो’ थांबला जीएमसीत
भीती बाळगत वाशीम जिल्ह्यातील संशयित रुग्णाने शुक्रवारी रात्रीच अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालय गाठले. यावेळी अपघात कक्षात सीएमओ आणि इंटर्न डॉक्टर होते. रुग्णाच्या सांगण्यावरुन त्या डॉक्टरांनी खबरदारी घेतली. मात्र, वरिष्ठ डॉक्टर नसल्याने त्या रुग्णावर योग्य उपचार झाले नाही. उपचाराच्या बाबतीत समाधान न झाल्याने रुग्ण तेथून निघून गेला अन् शनिवारी सकाळी पुन्हा रुग्णालयात दाखल झाला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : राजस्थान रॉयल्सची साथ सोडली कारण... ! संजू सॅमसननं मन मोकळं केलं; म्हणाला, त्यांच्याविरुद्ध खेळताना भावना...

गर्भवतींसाठी ‘अनॉमली स्कॅन’ अनिवार्य! राज्यभरातील रुग्णालयांना सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्देश

Mumbai News: एल्फिन्स्टन पूलबधितांना मिळणार बदलून घरे, म्हाडाकडून आणखी १२ घरांचा शोध सुरू

Dhule News : सवलत हवीये? मग खिशात ठेवा 'हे' स्मार्ट कार्ड; एसटी महामंडळाचा प्रवाशांसाठी मोठा निर्णय

Satara LPG Shortage: एलपीजीअभावी साताऱ्यातील उद्योग ठप्प! कामगारांवर उपासमारीची वेळ; उद्योजकांसमोर खर्च वाढ व तांत्रिक अडचणींचे संकट..

SCROLL FOR NEXT