File Photo
File Photo File Photo
विदर्भ

नगरसेवकाने तलाठ्यावर उगारली तलवार; तिसऱ्यांदा केला हल्ला

सकाळ वृत्तसेवा

हिंगणघाट (जि. वर्धा) : नगाजी पारडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅकटरला तलाठी आणि कोतवालाने अडविले. यावेळी ट्रॅक्टर मालक नगरसेवक सौरभ तिमांडे आणि स्कार्पिओतून आलेल चार ते पाच जणांनी तलाठी रवींद्र जाधव यांच्यावर तलवार उगारून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुरुवारी (ता. सात) हिंगणघाट उपविभागातील तलाठ्यांनी एकत्र येऊन तहसील कार्यालयात बेमुदत आंदोलन केले. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी तलाठी संघटनेने केली आहे.

सविस्तर वृत्त असे, तलाठी रवींद्र जाधव हे चीकमोह येथील कोतवाल गजानन कुडमते यांच्यासोबत नगाजी पार्टी येथे जात होते. दुपारी बारा वाजताच्या सुमारास नगाजी पार्डी गावाजवळ त्यांना दोन ट्रॅक्टर हिंगणघाटकडे येताना दिसले. त्यांनी दोन्ही ट्रॅक्टरला थांबवून पाहणी केली असता वाळू आढळली. त्यांनी ट्रॅक्टर चालकांना विचारणा केली असता वेना नदीच्या पात्रातून वाळू आणल्याचे सांगितले.

या परिसरात वाळू उत्खनन व विक्रीला परवानगी नसल्याने जाधव पंचनामा करून ट्रॅक्टर हिंगणघाट तहसील कार्यालय घेऊन येत होते. भीमराव मुंडे यांच्या शेताजवळ गाडीमधून नगरसेवक सौरभ तिमांडे तलवार घेऊन उतरला. शिवीगाळ करीत गळ्याभोवती तलवार मारण्याची धमकी जाधव यांना दिली. तसेच ट्रॅक्टर घेऊन तिथून पसार झाला, अशी तक्रार जाधव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना व पोलिसांना दिली.

हल्ला चढविण्याची ही तिसरी वेळ

तलाठ्यावर हल्ल्या झाल्याची माहिती मिळताच संतप्त तलाठ्यांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनोने यांना कारवाई करण्याचे निवेदन दिले. नगरसेवक सौरभ तिमांडे व साथीदारांना अटक होईपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा तलाठी संघटनेने दिला आहे. सौरभ तिमांडे याचा महसूल अधिकाऱ्यावर हल्ला चढविण्याची ही तिसरी वेळ आहे. सौरभ तिमांडे हा माजी आमदार राजू तिमांडे यांचे पुत्र आहे.

वाळू माफियांना राजकीय पाठबळ?

गौण खनिज प्रकरणी कारवाई करताना कोणतीही सुरक्षा पुरविली जात नाही. जीव धोक्यात घालून महसूल कर्मचारी कारवाई करीत असतात. वाळू माफियांना राजकीय पाठबळ असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणात नगरसेवक सौरभ तिमांडे याच्यासह ट्रॅक्टर चालक संजय आकरे, दिलीप कहुरके, मारोती कुडेकार, दिलीप भालेराव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवारी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT