cotton 
विदर्भ

या सोन्याला वेचणीच्या खर्चापेक्षाही कमी भाव; उत्पादक आले रडकुंडीला 

सकाळ वृत्तसेवा

गडचांदूर (जि. चंद्रपूर) : कोरोनाच्या सावटाने संपूर्ण देश ताळेबंदीत आहे. देशातील बाजारपेठसुद्धा बंद आहे. अशा परिस्थितीत पांढऱ्या सोन्याला अत्यल्प आहे. हा भाव बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. वेचणीसाठी लागलेल्या खर्चापेक्षा कमी भावाने कापूस खरेदी केला जात असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच आर्थिक कोंडी होत आहे. 

कोरोनामुळे देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. जीवनावश्‍यक वस्तूंशिवाय अन्य बाजारपेठा बंद आहेत. निसर्गाच्या प्रकोपानंतर काही पिके शेतकरी राजाच्या हातात आली आहेत. मात्र, लागवडीच्या खर्चापेक्षा हातात कमी रकम येणार असल्याने शेतकऱ्यांचे पुढील हंगामाचे गणित बिघडणार असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. कापसाला कमी भाव असल्याने खर्चही निघेनासा झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. ही शेतकऱ्यांकडे पूर्वीचा तर काही कडे शेवटचा कापूस शिल्लक आहे. परंतु, कापसाची तुलना त्याच्या प्रतवारीने न करता वाटेल त्या भावाने खरेदी केला जात आहे. 1500 ते 2000 रुपये क्विंटलपासूनचा दर शेतकऱ्यांना दिला जात आहे. शासनाच्या हमी भावानुसार 5500 रुपये पहिल्या ग्रेडचा कापूस आहे. परंतु, शासनाची पणन खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांना कमी भावात कापूस विकावा लागत आहे. 

अवश्य पहा- Video : विश्वास बसेल का? चौदा फुट उंच झाड तेही मिरचीचे...

सीसीआय खरेदी केंद्र सुरू करण्याची गरज 

शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला हमी भावापेक्षा कमी भावाने खरेदी केली जात आहे. त्याला हमी भाव भेटावे, अशी आशा पल्लवित असून, सीसीआय खरेदी शासनाने चालू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 
 

शासनाने आमचा अंत पाहू नये. हमीभावापेक्षा कित्येक पटीने कमी दरात कापूस खरेदी केला जात आहे. यातून शेतकऱ्यांची लूट चालविली जात आहे. शासनाने त्वरित लक्ष घालून समस्या सोडवावी. 
- मनोज भोजेकर, शेतकरी, गडचांदूर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT