cotton selling center of panan mahasangh starts in yavatmal 
विदर्भ

अखेर पणन महासंघाला सापडला खरेदीचा मुहूर्त, पाच जिनिंगवर कापूस खरेदी सुरू

चेतन देशमुख

यवतमाळ : जिल्ह्यातील तीन केंद्रांतील पाच जिनिंगवर शुक्रवारपासून (ता.27) 'पणन'च्या कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. ढगाळ वातावरण असल्याने आवक कमी होती. पहिल्या दिवशी तीनही केंद्रांवर 30 वाहनांच्यावर नोंदणी झाली असून, 'पणन'च्या कापूस खरेदीला मुहुर्त सापडला आहे.

यंदा दिवाळीनंतर जिल्ह्यात पणन महासघांच्या कापूस खरेदी केंद्रांना मुहूर्त सापडला आहे. परिणामी, गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय कापूस खरेदी केंद्र उघडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. जिल्ह्यात पहिल्या दिवशी तीन केंद्रांतील पाच जिनिंग सुरू करण्यात आल्या आहेत. ढगाळ वातावरण असतानाही पहिल्या दिवशी केंद्रांना समाधानकारक प्रतिसाद मिळाला. प्रत्येक जिनिंगवर 50च्यावर वाहने होती. कापूस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हुकमी पीक आहे. यंदा जिल्ह्यात यवतमाळ, कळंब व आर्णी हे तीनच केंद्र सुरू राहणार आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 20 हजार 328 शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे.

पणन महासंघाकडून पाच हजार 825 रुपये हमीभाव दिला जाणार आहे. खासगी बाजारात शासकीय केंद्रांच्या तुलनेत बराबरीचे दर आहेत. परिणामी, शासकीय व खासगी अशा दोन्हीकडे कापसाची आवक वाढली आहे. येत्या काही दिवसांत कापसाचे दर वाढण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळेच कापसाची आवक मंदावली आहे. असे असले तरी कापूस मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येण्याची शक्‍यता आहे. यवतमाळ केंद्रावर कापूस खरेदीची सुरुवात करताना 'पणन'चे संचालक सुरेश चिंचोळकर, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, पणनचे व्यवस्थापक चक्रधर गोस्वामी, उपव्यवस्थापक डी. जी. गायनर यांच्यासह शेतकरी व जिनिंगचालक उपस्थित होते.

बोंडअळीने गुणवत्तेवर परिणाम -
जिल्ह्यात यंदा बोंडअळीने कापूस पीक फस्त केले आहे. त्यानंतरही शेतकऱ्यांनी घरात आलेला कापूस विक्रीसाठी बाहेर काढला आहे. मात्र, पहिल्या वेचातही बोंडअळीचा परिणाम दिसून येत आहे. गाठीत पिवळा व लालमार्कीग येत आहे. त्यामुळे कापसाच्या गुणवत्तेवर परिणाम झालेला दिसत आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी, अशी मागणी जोर धरीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र; महाराष्ट्रातील थंडी कमी होणार? राज्यात पावसाची शक्यता

प्रेयसीने साथ सोडली, त्याने जिद्द सोडली नाही! ७ वर्षांच्या संघर्षानंतर UPSC मध्ये मिळवला २३८ वा क्रमांक, कोण आहे आयुष कृष्णा?

Amravati News: मोर्शी नगरपरिषदेच्या गच्चीवर पार्टी, समाजमाध्यमांवर व्हिडिओ व्हायरल, जिल्ह्यात खळबळ

Maharashtra Weather : राज्यात थंडीची चाहूल अधिक गडद; धुळ्यात पारा १०.४ अंशांवर, तर रत्नागिरीत तापमानाने गाठला ३६.१ अंशांचा टप्पा

IND vs NZ, 5th ODI: विदर्भाच्या खेळाडूचं पदार्पण, सिराजलाही संधी, मग Playing XI मधून कोण झालं बाहेर? भारताला मालिका विजयाची संधी

SCROLL FOR NEXT