court give notice to the state and central government for the establishment of development boards in vidarbha 
विदर्भ

विदर्भ विकास मंडळांच्या स्थापनेसाठी सरकारला न्यायालयाची नोटीस, केंद्र व राज्याला दोन आठवड्यांचा अवधी

केतन पळसकर

नागपूर : विदर्भ विकास मंडळांच्या निर्मितीसाठी राज्यपालांना तत्काळ आदेश द्यावे, अन्यथा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी या विनंतीसह दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्र व राज्य सरकारला नोटीस बजावली. तसेच, उत्तर दाखल करण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला. 

स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थक नितीन रोंघे व विदर्भ विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. कपिल चांद्रायण यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार, विकास मंडळ स्थापन करण्याबाबत घटनेच्या कलम ३७१ (२) नुसार राज्यपालांना विशेष अधिकार प्राप्त आहेत. असे असताना राज्य मंत्रिमंडळाचे निर्देश नसल्यामुळे विकास मंडळांचा विषय खोळंबला आहे. त्यामुळे, विकास मंडळांच्या निर्मितीसाठी राज्यपालांकडे अधिकार असताना देखील ते निर्णय घेत नसल्यामुळे संवैधानिक पेच निर्माण झाल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. न्यायालयाने विकास मंडळांच्या निर्मितीसाठी राज्यपालांना तत्काळ आदेश द्यावे, अन्यथा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या विनंतीसह याचिका दाखल केली. न्यायालयाने सर्व बाजू लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारला नोटीस बजावून दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यातर्फे वरिष्ठ विधीज्ञ अ‌ॅड. श्रीहरी अणे, अ‌ॅड. अक्षय सुदामे यांनी, केंद्र सरकारतर्फे सहाय्यक महाधिवक्ता उल्हास औरंगाबादकर यांनी, राज्य शासनातर्फे सरकारी वकील केतकी जोशी यांनी बाजू मांडली. या प्रकरणी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांच्या समक्ष सुनावणी झाली. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

SCROLL FOR NEXT