court give punishment to 3 people in Yavatmal  
विदर्भ

जादूटोण्याच्या संशयावरून केला खून; पती-पत्नीसह दोन मुलांनाही जन्मठेप; न्यालयाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

पुसद (जि. यवतमाळ) : जादूटोणा केल्याचा राग मनात धरून भावजईला जिवाने मारल्याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आज (ता. २) पती-पत्नी व दोन मुलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव पती जयानंद धबाले (वय ५५), पत्नी आशा (वय ५०) व मुले किरण (वय २८) व निरंजन (वय ३०) यांचा समावेश आहे. मृत सुनंदा हिने जादूटोणा केल्यामुळेच आमच्या घराची प्रगती होत नाही, असा गैरसमज निर्माण झाला होता. 

नेहमीप्रमाणे १ मे २०१५ रोजीदेखील जावाजावांत वाद झाला. यावेळी सुनंदाची जाऊ आरोपी आशाने पती व मुलांच्या मदतीने तिला जिवाने ठार करण्याच्या उद्देशाने मुलांना हात धरायला लावले. पती जयानंद धबाले याने कुऱ्हाडीने वार करून सुनंदास ठार केले. या घटनेची तक्रार आरोपीचा लहान भाऊ किशोर धबाले याने पोलिसांत दिली. 

या प्रकरणात एकूण दहा साक्षी तपासण्यात आल्या. यामध्ये मृत महिलेसोबत असलेला सातवर्षीय नातू सार्थक याचीदेखील साक्ष झाली. सरकारी पक्षाची बाजू ॲड. महेश निर्मल यांनी मांडलेली बाजू ग्राह्य मानून न्यायालयाने चौघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Death Penalty: मेरठ कोर्टाचा ऐतिहासिक निकाल! पतीला साप चावल्याचा बनाव करणाऱ्या पत्नीसह प्रियकराला फाशीची शिक्षा

Baramati News : सिलिकॉन व्हॅलीच्या धर्तीवर बारामतीत ‘इनोव्हेशन व्हॅली’ उभारणार! शरद पवार यांची घोषणा....

Pune Crime : अल्पवयीन मुलांकडून तरुणाचा निर्घृण खून; तिघेजण ताब्यात

Jharkhand Health : जिल्हा रुग्णालयांत सुरू होणार DNB पदव्युत्तर अभ्यासक्रम; आरोग्य विभागाचा पायलट प्रोजेक्ट

Farmer Scheme: शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून 5,000 रुपये मिळणार; कसा कराल अर्ज?

SCROLL FOR NEXT