cricket Teams attacked on each other in Chandrapur  
विदर्भ

क्रिकेट सामन्यादरम्यान झाला वाद अन् मैदानात घुसले भाडोत्री गुंड; झाला तुफान राडा

श्रीकांत पशेट्टीवार

चंद्रपूर : मूल येथे आयोजित "संतोष रावत चषक' या नावाने आयोजित  क्रिकेट सामन्यात  काल रविवारला दोन संघात तुफान राडा झाला. मारहाणीत  एका संघातील खेळाडू गंभीर जखमी झाला.त्यांच्यावर चंद्रपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. बजरंग सेना पुरस्कृत हे क्रिकेट सामने आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष "संतोष रावत चषक'  या नावाने  मूल येथील सोसायटी मैदानावर क्रिकेट सामने आयोजित केले आले.

सायंकाळी चंद्रपूर आणि मूल येथील संघामध्ये सामना होता. मात्र, सामना सुरु होण्यास उशीर झाला. त्यामुळे चंद्रपूरच्या संघाने प्रकाशझोतात सामने खेळविण्याची मागणी केली. तत्पूर्वी चंद्रपूर संघातील एका खेळाडूने बॉल हातात घेवून खेळपट्टीवर गोलंदाजी टाकून बघितली. यावर  मूल संघातील खेळाडूने आक्षेप घेतला आणि वादाला सुरवात झाली. 

दोन्ही संघात मैदानावरच तुफान हाणामारी झाली. काही लोकांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला. चंद्रपूरचे खेळाडू परत जाण्यासाठी मूल येथील गांधी चौकात उभे होते. त्याच दरम्यान मूलच्या काही खेळाडूंनी भाडोत्री गुंड आणणून त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत संगम दहागावकर यांच्या माथ्यावर दुचाकीच्या चाबीने वार केला. 

संगमच्या डोळ्याच्यावर चावी माथ्यात आत घुसली. संगम तिथेच बेशुद्ध झाला. त्यानंतर गुंडानी तिथून पळ काढला. संगमची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर चंद्रपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान प्रती वनकर, व्यंकटेश पुलकवार, अमित आसलानी, मुन्ना देव यांच्या विरोधात रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: न्यायाधीशाला ‘विकण्याचा’ प्रयत्न, ३० लाखांच्या लाच प्रकरणात ७० वर्षीय वकिलाला सुप्रीम कोर्टाचा जबरदस्त धक्का!

Latest Marathi News Live Update : केरळ, आसामसह पुद्दुचेरीत आज एकाच टप्प्यात मतदान; सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात

Chhatrapati Sambhajinagar: शहरात वर्षात ९४ हजार वाहनांची भर; दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक, आरटीओला ४५६ कोटींचा महसूल

Nashik: बड्या IT कंपनीत महिलेवर ५ वर्षे अत्याचार, महिलांना करायचे टार्गेट; ९ गुन्हे दाखल, ६ जणांना अटक

Chhatrapati Sambhajinagar: वेल्डिंग दोषामुळे ३ कोटी लिटर पाणी वाया; शहरात पाणी पुरवठा दोन दिवस उशिरा

SCROLL FOR NEXT