marriage 
विदर्भ

बॅंडबाजासह आली नवरदेवाची वरात आणि वधूवर झाला गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

वरुड (जि. अमरावती ) : विवाह समारंभ घरगुती स्वरुपात पार पाडण्याचे शासनाचे आदेश डावलून नागपुरचा नवरदेव चक्‍क बॅंडबाजासह वाजतगाजत वरुड येथे लग्नासाठी आला आणि वधुकडच्यांचे बिंग फुटले कारण त्यांनी विवाहाविषयीची कोणतीच माहिती प्रशासनाला दिली नव्हती. परिणामी होणाऱ्या वधुसह आणखी तीन जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वी वधुवर पोलिसांनीच गुन्हा दाखल केला आणि लग्नाची ौस अशीच फिटली.

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव शहरात वाढू नये म्हणून राज्य व केंद्र शासनाकडून घरगुती विवाह समारंभाकरिता नियमांचे पालन करून 10 लोकांच्या उपस्थितीत विवाह समारंभ पार पाडण्याची परवानगी दिल्या जाते. मात्र सोमवारी (ता.15) सकाळच्या सुमारास नागपूर येथील नवरदेवासह वऱ्हाड्यांनी वरुड शहरातून चक्क बॅंडबाजा, घोड्यासह वरात काढली. तथापि, वधुपित्याने माहिती न दिल्याच्या कारणावरून न. प. मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून वरुड पोलिसांनी वधू व इतर चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

नियम धाब्यावर बसवून सोमवारी शहरातील अरविंद बॅंक परिसरातून महात्मा फुले चौक परिसरापर्यंत घोडा, वाजंत्री व वऱ्हाड्यांसह वाजतगाजत नवरदेवाची वरात काढण्यात आली. दरम्यान बॅंडच्या तालावर बेधुंद नाचत असलेल्या महिला वऱ्हाड्यांसह इतरांना कोरोनाचे भय दिसून आले नाही. प्रसार माध्यमांनी ही बाब उघडकीस आणल्यानंतर मंगळवारी (ता. 16) अखेर प्रशासनाने दखल घेतली.

सविस्तर वाचा - घरफोडीतील पाच लाखांसाठी सनीचा गेम

याप्रकरणी शहरातील एका पित्याने तहसील कार्यालयाकडून घरामध्ये मुलीचा विवाह करण्याकरिता परवानगी घेतली होती. परंतु घेतलेल्या परवानगीची अवहेलना झाल्याने मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांनी याप्रकरणी वरुड पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यामुळे वरुड पोलिसांनी वधू व इतर चार, अशा एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा सखोल तपास करण्यात येईल. तपासाअंती आणखी काही वऱ्हाड्यांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती ठाणेदार मगण मेहते यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sukhoi Fighter Jet Crash : 'Purvesh Is No More..'! कॅप्टनचे ते शब्द ऐकताच पूर्वेशच्या वडिलांवर मोठा आघात; म्हणाले, 'छत्रपती शिवरायांचा त्याच्यावर..'

US Missile Test: ‘डुम्सडे मिसाईल’ची यशस्वी चाचणी; अमेरिकेकडून पुन्हा शक्तिप्रदर्शन

Ro-Ro Boat: रो-रो फेरी सुरू होताच बंद, प्रवाशांचे आरक्षण पैसे परत; नेमके कारण काय?

Loco Pilot Leaves Train : ट्रेन अर्ध्यातच उभी करुन निघून गेला लोको पायलट; होळीच्या गर्दीत प्रवाशांना ३ तास सहन करावा लागला मनस्ताप

Latest Marathi News Live Update : इराण युद्धाचा पाकिस्तानला तगडा झटका

SCROLL FOR NEXT