Crocodile, turtle survey
Crocodile, turtle survey 
विदर्भ

Crocodile, turtle survey : पेंचमध्ये आढळले ३० कासव; दुर्मिळ पानमांजराचेही अस्तित्व

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पात पहिले मगर आणि कासव सर्वेक्षण करण्यात आले. सहभागी चमूनी अंदाजे २०० किमी नदीच्या लांबीचे सर्व्हेक्षण केले. त्यात ३० मगरींचे निरीक्षण करण्यात आले. सोबतच २४ गुफा, नांदपूर संरक्षण कुटी ते किरगीसर्रा पर्यंतच्या पट्ट्यात मगरींची सर्वाधिक घनता आढळून आली आहे.

कासव फक्त तोतलाडोह जलाशयातच आढळून आले. तोतलाडोहात लीथच्या सॉफ्टशेल कासवाची नोंद झाली. तो पेंचमध्ये पहिल्यांदाच दिसला आहे. पानमांजर प्रत्यक्षपणे दिसली नसली तरी मच्छीमारांशी झालेल्या संवादामध्ये त्याचे अस्तित्व असल्याचे निष्पन्न झाले आहे.

यासर्वे करिता तांत्रिक बाबी सांभाळण्यासाठी तीनसा इकोलॉजिकल फाउंडेशनची मदत घेण्यात आली. त्यांच्या चमूने सर्वेक्षणाची रचना तयार करताना तोतलाडोह, अप्पर आणि लोअर पेंच जलाशय असे तीन भाग केले होते.

सर्वेक्षणासाठी विभाग आणि मच्छीमार बोटींचा वापर करण्यात आला. सहभागींनी 'मॉडिफाइड बेल्ट ट्रान्सेक्ट ऑन बोट' ही पद्धत वापरून सर्वेक्षण केले. ही एक प्रकारची सुधारित लाईन ट्रान्सेक्ट पद्धत आहे.

बिघडविली मत्सविविधता

काठावर गवताची घनता जास्त असल्यामुळे कासवांना प्रत्यक्ष पाहणे कठीण होते. संवर्धनासाठी मदत करण्यासाठी लगतच्या भागात "मगरमित्र" असा उपक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे. याशिवाय, अंडी उबवण्याचा कालावधी असलेल्या जून महिन्यात मासेमारी टाळा अशा सूचना देण्यात आल्यात. दरम्यान, आक्रमक तलापिया माशांचा स्थानिक मत्स्यविविधतेवर घातक प्रभाव टाकणारा प्रभाव कमी करण्यासाठी योजना आखण्यावर चर्चा करण्यात आली.

सर्वेक्षणात गोळा केलेल्या माहितीच्या आधारे एक अहवाल तयार केला जाईल जो पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या संवर्धन प्रक्रियेत मदत करणार आहे. मगरी नदीच्या परिसंस्थेतील सर्वोच्च शिकारी असल्याने, त्यांची उपस्थिती आणि जागेचा वापर एका चांगल्या परिसंस्थेच लक्षण दर्शवते असे पेंच प्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांनी सांगितले.

सर्वेक्षणात मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भटकर, यांनी सहभागींना अशा नागरिक विज्ञान आधारित सर्वेक्षण बाबत माहिती दिली. तिनसाचे डॉ. अमित कुमार, डी.पी.श्रीवास्तव, प्रेरणा शर्मा, सोनू दलाल यांनी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, कार्यपद्धती आणि माहिती संकलन यासारख्या सर्व तांत्रिक तपशीलांची काळजी घेतली.

क्षेत्र संचालक श्रीलक्ष्मी, डॉ. पीएन शुक्ला यांनी सहभागी आणि आयोजकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि प्रमाणपत्रांचे वितरण केले. संचालन वन परिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर आणि आभार राहुल शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT