chandrapur Salt 
विदर्भ

Video : अफवेने बिघडली भाजीची चव, मिठात महागाईचा खडा! 

राहुल रायपुरे

व्याहाड खुर्द (जि. चंद्रपूर) : लॉकडाउन काळात सर्व कामे ठप्प आहेत. मीठाचीही मोठी टंचाई भासणार, अशी अफवा आहे. या अफवेचा फायदा घेत दुकानदार चढ्या भावाने विक्री करून ग्राहकांची लूट करीत आहेत. जेवणात महत्त्वाचा घटक असलेल्या मीठाच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी तालुक्‍यातील बहुतांश दुकानांमध्ये बघायला मिळत आहे. 

देशात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. या विषाणूंच्या प्रतिबंधासाठी केंद्र सरकारने देशात लॉकडाउन केले आहे. जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व उद्योग, बाजारपेठा बंद आहेत. येत्या काही दिवसांत मिठाची टंचाई जाणवणार असल्याची अफवा ग्रामीण भागात पसरली आहे. त्यामुळे तालुक्‍यातील गेवरा, बोरमाळा, निफंद्रा, कढोली, आकापूर, डोंगरगाव, अंतरगाव येथील दुकानदारांनी मिठाची चढ्या भावाने विक्री सुरू केली आहे. यानंतरही नागरिक मिठाची खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी करीत आहेत. 

लॉकडाउनमुळे आधीच हाताला काम नाही. उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्‍न आहे. घरात आर्थिक चणचण असताना मिठाचे दर वाढविण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आजघडीला अर्धा किलो मीठाचे पॅकेट साधरणत: 50 ते 80 रुपयांत खरेदी करावे लागत आहे.

मिठाशिवाय जेवणालासुद्धा चव येत नसल्याने स्वयंपाकातील महत्त्वपूर्ण घटक असल्याने अनेकांनी टंचाई निर्माण झाल्यास काय करायचे या काळजीपोठी अनेकांनी मिठाची अतिरिक्त खरेदी करून ठेवत आहेत. मिठासारख्या जीवनावश्‍यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री करून नागरिकांची आर्थिक लूट चालविली जात असल्याने प्रशासनाने याची गंभीरतेने दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

मोफत मीठ द्या
महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह केला. त्यानंतर कर कमी करून मीठ कमी भावात नागरिकांना उपलब्ध करून दिले गेले. मात्र, आता मिठाची टंचाई भासवून चढ्या भावाने विक्री केली जात आहे. यातून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत आहे. राज्य शासनाने कोरोनाच्या काळात नागरिकांना मोफत मिठ देण्याचे धोरण राबवा. 
- गोपाल रायपुरे, प्रदेश सचिव, रिपाइं

मिठाची टंचाई नाही 
मिठाची कोणतीही टंचाई नाही. मात्र, टंचाई असल्याबाबतची केवळ अफवा पसरविली जात आहे. सर्व नागरिकांना मिठ मिळणार आहे. मिठाची चढ्या भावाने विक्री केली जात नाही. 
- सुनील किराणा स्टोअर्स, व्याहाड खुर्द.

अफवेतून नागरिक गर्दी 
मिठाची टंचाई भासणार या अफवेतून नागरिक गर्दी करीत आहेत. मात्र, कोणत्याही दुकानदारांकडून चढ्या भावाने विक्री सुरू नाही. चढ्या भावाने विक्री करणाऱ्या दुकानदारांची तहसीलदारांकडे तक्रार करण्यात यावी. 
- लक्ष्मी किराणा स्टोअर्स, व्याहाड खुर्द.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Borkhind Samruddhi Highway Interchange : नाशिकला समृद्धी महामार्गाचा थेट फायदा! बोरखिंड इंटरचेंजला मुख्यमंत्र्यांची मंजुरी, 343 कोटींचा निधी जाहीर

BABAR AZAM: शतक झालं नाही, तरी बाबर आझमने इतिहास रचला! ७६ धावांच्या खेळीने विराट-पाँटिंगच्या खास क्लबमध्ये एन्ट्री, नेमका कोणता विक्रम?

“मी जीवन संपवतोय…” ‘नवरा माझा नवसाचा’ फेम अभिनेत्याची खळबळजनक पोस्ट; पोलिसांची धावाधाव

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

CM Devendra Fadnavis : एमपीएससी परीक्षेतील गैरप्रकाराबाबत सरकार कठोर; राजकीय पोळी भाजू देणार नाही; सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी

SCROLL FOR NEXT