deulgaonraja market.jpg 
विदर्भ

हे काय! आठवडी बाजारात उसळली गर्दी; दुपारनंतर प्रशासनाला आली जाग अन्...

सकाळ वृत्तसेवा

देऊळगावराजा (जि.बुलडाणा) : मागील आठवड्यात दाबून भरलेल्या आठवडी बाजारानंतर आठवडी बाजार भरविण्यास प्रशासनाची मुकसंमती आहे की, काय म्हणून आज (ता.१३) व्यापाऱ्यांनी दुकाने सजवली. हळूहळू बाजार चांगलाच फुलला अन् एकच गर्दी उसळली. दरम्यान, सामाजिक अंतर राखण्याच्या उद्देशालाच तडा गेल्याने थेट जिल्हाधिकारी यांनी तालुका प्रशासनास तंबी दिल्यानंतर स्थानिक प्रशासनाला खडबडून जाग आली आणि दुपारनंतर आठवडी बाजार गुंडाळण्यात आला.

लॉकडाउन सुरू झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले होते. मात्र, लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर मागील आठवड्यात प्रशासनाच्या कुठल्याही सूचना नसताना आठवडी बाजार भरला होता. परिणामी, आठवडी बाजाराला प्रशासनाची मूक संमती आहे की, काय असा गैरसमज झाल्याने आज सकाळपासूनच आठवडी बाजारात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटण्यात सुरुवात केली. 

त्यावेळी नगरपालिका प्रशासनाने जालना टेंभुर्णी जाफराबाद ह्या तालुक्याबाहेरुन आलेल्या व्यापाऱ्यांना परत पाठविले. मात्र, बाजारात तैनात असलेले कर्मचारी निघून जाताच बाजार फुलला आणि नागरिकांनी आठवडी बाजारात गर्दी केली. सदर प्रकाराबाबत दक्ष नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तालुका प्रशासन खडबडून जागे झाले आणि पोलिस बंदोबस्तात महसूल आणि नगरपालिका प्रशासनाने भरलेला आठवडी बाजार दुपारनंतर गुंडाळण्यात आले. तहसीलदार सारीका भगत, स्थानिक तलाठी तागवाले, नगरपालिका प्रशासनातील राजू अग्रवाल पालिका व पोलिस कर्मचारी यांनी थेट बाजारात जाऊन आठवडी बाजार बंद केले.

मूक संमती असल्याचा गैरसमज
लॉकडाउन झाल्याने प्रशासनाने आठवडी बाजार भरविण्यास मूक संमती दिली असल्याचा गैरसमज झाल्याने व्यापाऱ्यांनी आठवडी बाजारात दुकाने थाटली. बाजारात गर्दी वाढत गेली आणि सध्यास्थितीत कोरोना संसर्ग वाढलेल्या जाफराबाद जालना या लगतच्या तालुक्यातील नागरिक आठवडी बाजारात दाखल झाल्याने एका दक्ष नागरिकाने थेट जिल्हाधिकारी यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून या गंभीर प्रकाराबाबत माहिती देऊन चिंता व्यक्त केली आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांना आवश्यक मौखिक निर्देश मिळाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

Numerology: 'या' जन्मतारखांच्या लोकांवर असते बुध-शुक्राची कृपा; कमी मेहनतीत मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Rabid Dog Attack: पिसाळलेल्या कुत्र्याने आळे गावात उडवली खळबळ; नऊ जणांना चावा, अनेकांना रुग्णालयात हलविले

SCROLL FOR NEXT