curd and others product from melghat will be global soon 
विदर्भ

मेळघाटचे दही, रबडी, खवा होणार ग्लोबल; पर्यटकांसाठीही खास मेजवानी

श्रीनाथ वानखडे

मेळघाट ( जि. अमरावती ) : मेळघाट सर्वदूर व्याघ्र प्रकल्पासाठी परिचित आहे. त्यामुळेच येथील पर्यटनाला चालना मिळत आहे. आता इथे येणारा पर्यटक रिकाम्या हाती परत जाणार नाही. कारण आता खवा, दही, रबडी, स्ट्रॉबेरीसह जंगलातील रानभाजी व फळांची चव केवळ गावापुरती मर्यादित राहणार नसून 'लोकल टू ग्लोबल' होणार आहे.

चिखलदराचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ हे सध्या जंगलातील हिरवळीवर बसून गावागावांतील तरुणांच्या सभा घेत आहेत. वर्ग एकचा अधिकारी आपल्यासोबत बसून आपल्याला आपल्या समृद्ध गावाचे स्वप्न दाखवत आहे. त्यामुळे तरुणांमध्ये देखील उत्साह पाहायला मिळत आहे. गावातील व परिसरातील सरकारी अधिकारी तसेच कर्मचारी यांच्याशी संपर्क करून विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन गावकऱ्यांना करीत आहेत. तालुक्‍यातील माथा ते पायथा, असे 100 टक्के गावांशी संपर्क करून पाणलोट नियोजन, शिवारफेरी आदींबाबत जनजागृती सुरू आहे. चिखलदरामध्ये थंड वातावरण असल्याने येथे स्ट्रॉबेरी, कॉफीचे उत्पादन घेतले जात आहे. हे वातावरण सफरचंदाला पोषक असल्याने नजीकच्या काळात पर्यटकांची सलादपासून विविधांगी ज्यूसची मेजवानी मिळणार आहे. अनेक गावांतील नागरिकांना सामूहिक वनहक्कअंतर्गत वनपट्टे मिळाले असून यामधून मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव तेंदूपत्ता, बांबू, लाख, मध, डिंक, आवळा आदी अनेक माध्यमातून अर्थार्जन करीत आहेत.

स्वप्नांना मिळणार बळ -
समृद्ध गावकरी किंवा गावाचे व्हिडिओ दाखवून तरुणांना प्रेरित केले जाते. तेथे शक्‍य झाले, तर येथे पण आपण शक्‍य करू. स्वप्नांना प्रयत्नांची जोड दिली तर मी समृद्ध होणार व प्रत्येक व्यक्ती समृद्ध झाल्यावर गाव समृद्ध होणार असल्याने शासकीय यंत्रणा या स्वप्नांना बळ पुरविणार आहे.

प्रत्येक गाव समृद्ध होणार -
मेळघाटातील दही, रबडी, खवा केवळ स्थानिक गावापुरता मर्यादित न राहता त्याचे ग्लोबल मार्केटिंग केले जाणार आहे. त्यामुळे बचतगटासह गावकरी समृद्ध होणार आहेत. राहू प्रमाणे इतरही गावात बांबूनिर्मिती व वस्तूंना चालना देणार असून यासाठी ग्रामसभा घेत असल्याचे चिखलदऱ्याचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT