Cycle Day on Wednesday in Amravati Municipal Corporation 
विदर्भ

आठवड्याचा प्रत्येक बुधवार आता ‘सायकल डे’; वाहनांना प्रवेशास मनाई, कोणी घेतला निर्णय?

कृष्णा लोखंडे

अमरावती : माझी वसुंधरा अभियानाचा श्रीगणेशा करताना महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी आपली शासकीय व खासगी वाहने घरी ठेवून सायकलने कार्यालय गाठले. महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच पार्किंग झोन रिकामे होते. अभियानास मिळालेला प्रतिसाद बघता आयुक्त प्रशांत रोडे यांनी यापुढे दर बुधवारी सर्वांनी सायकलनेच कार्यालयात यावे, अशी सूचना जारी केली.

सकाळी दहा वाजता महापालिकेतील कार्यालये सुरू होतात. त्याअगोदर काही अधिकारी व कर्मचारी सायकलने पोहोचले. ज्यांच्याकडे सायकली नाहीत, ते पायदळ आले. आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त सुरेश पाटील, सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे कार्यालयीन वेळेत सायकलने पोहोचले. महापैर चेतन गावंडेही सायकलवर आले. काही पदाधिकारी व नगरसेवक आलेच नाहीत. अनेकांना सायकल नसण्याचा फटका बसला.

महापालिकेतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांना सायकलवर बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, प्रदूषण रोखण्यासाठी सुरू केलेल्या अभियानाचे कौतुकही केले. यापुढे दर बुधवारी अधिकारी व कर्मचारी सायकलनेच येतील, अशी सूचना आयुक्तांनी प्रशासनाला केली. दर बुधवारी वाहनांना महापालिकेत प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

३१ मार्चपर्यंत वसुंधरा अभियान चालणार आहे. या उपक्रमात पहिल्या दिवशी नगरसेवक विलास इंगोले, तुषार भारतीय, पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख, शहर अभियंता रवींद्र पवार, सहायक आयुक्‍त योगेश पीठे, अमित डेंगरे, पशुशल्यचिकित्सक डॉ. सचिन बोंद्रे, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, सायकल फॉर हेल्थ ॲण्ड फन यांनी सहभाग घेतला.

व्याप्ती वाढविण्याची गरज

आरोग्य व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा व अधिनस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांसह परिसरातील किमान पाच नागरिकांना याचे महत्त्व पटवून अभियानाची व्याप्ती वाढविण्याविषयी सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्‍त प्रशांत रोडे यांनी केले.

नागरिकांनी सहभाग घ्यावा

सायकल चालविल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. अमरावतीकर नागरिकांनी या अभियानासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सर्व सामाजिक संस्थांनी विविध उपक्रम राबवावे. शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर चेतन गावंडे यांनी केले.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: राही सरनोबतचा एक 'निशाणा' चुकला अन् भारताचे पदक गेलं; 'Frame hit' चा फुल ड्रामा, ५५ हजार भरून अपील केले पण...

बाबो! विद्या बालनने सगळ्यांसमोर पती सिद्धार्थला केलं किस, रोमँटिक लिपलॉकचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

Solapur Edible Oil: खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त

Latest Marathi News Live Update : अंबाला येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या ६ वर

SCROLL FOR NEXT