विदर्भ

पर्यावरण संरक्षणार्थ सायकलने देश भ्रमंती; रामप्रसाद पोहचला लाखनीत

रामप्रसाद ने आतापर्यंत २५००० किमी पेक्षा जास्त सायकल चालवलेली आहे.

अभय भुते

लाखनी (जि. भंडारा) - दिवसेंदिवस होत चाललेला पर्यावरनाचा ह्रास आणि यामुळे उद्भवणारे नैसर्गिक संकट हे कमी व्हावेत यासाठी अनेक निसर्गप्रेमी वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करत असतात याच प्रमाणे रामप्रसाद नस्कर हा पर्यावरण वाचवण्याचा संदेश घेऊन सायकल ने देशभ्रमान करून लाखनी शहरात पोहचला.

रामप्रसाद ने आतापर्यंत २५००० किमी पेक्षा जास्त सायकल चालवलेली आहे. रामप्रसाद भारत देश सोडून नेपाळ, बांग्लादेश मध्ये सुध्दा आपला संदेश घेऊन पोहचले होते तेथील नागरिकांना ही पर्यावरण वाचवण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल,असे मार्गदर्शन त्यांनी केले. रामप्रसाद हे 2010 पासुन सायकल नेच प्रवास करतात,किंबहुना त्यांनी लग्न झाल्यावर आपल्या बायकोला सायकलनेच घरी आणले होते.

ते मूळचे कोलकाता चे रहिवासी आहेत तसेच श्रीपुर शिक्षा सदन शाळेत शिक्षक म्हणुन काम करतात. रामप्रसाद यांनी आपली सायकल यात्रा 30 सप्टेंबर महिन्यात. सुरू केली. त्यांनी या अभियानात दहा राज्य पार करत आतापर्यंत 5500 किमी चा प्रवास लाखनी पोहचेपर्यंत केला आहे. तसेच .ते दिवसातुन 180किमी ते 200 किमी पर्यंत सायकल चालवितात.

विशेष म्हणजे शाळेतून सुट्टी घेऊन ते या पर्यावरण हिताच्या कार्यात सहभागी झाले आहेत.,या दिवसात त्यांना कोणताही पगार शाळा देत नाही हा सर्व खर्च स्वतः करतात.त्यांना या मोहिमेलेला 20,000 चा खर्च आला असे त्यांनी सांगितले.ते आता आपल्या पत्नी ला सुध्दा या मोहिमेत सामील करणार असून समोरचे १५०० किमी अंतर ते दोन आठवढ्यात पूर्ण करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT